मुंबई : आदित्य ठाकरे हे स्कॉटलॅंडला पर्यावरण मंत्री असताना पर्यावरण सीओपी 26 च्या परिषेदसाठी गेले होते. साधारण ते 31 ऑक्टोबर ते 12 नोव्हेबंर दरम्यान होतं. ती परिषद 12 नोव्हेंबर रोजीच संपली तरी देखील आदित्य ठाकरे दोन ते तीन आठवडे त्याठिकाणी राहिले होते. त्याच दरम्यान उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यावेळी आदित्य ठाकरे यांची याठिकाणी जास्त गरज होती. त्याठिकाणी ते फुटबॉलची मॅच पाहत होते. तसेच शासकीय पैशांनी ते गेले होते. त्यामुळे त्यांनी परत यायला हवं होतं. तरी देखील ते तिथेच आपल्या मित्रांसमवेत थांबले होते. असा आरोप राहुल शेवाळे यांनी केला आहे.
दहा डोक्याचा नाही तर 50 खोक्यांचा खोकासुराचं शिवाजी पार्कवर दहन
दावोस इन्व्हेस्टर्स फोरमला गेले होते. त्याचा त्यांच्याशी काहीही संबंध नव्हता. तरी देखील ते गेले होते. तसेच त्यांनी पन्नास हजार कोटींची करार झाले असल्याचं सांगितलं होतं. तेव्हा ते करार आता कुठे गेलेत ? त्या करारातून किती लोकांना नोकऱ्या मिळाल्या. त्याची माहिती देखील सादर करायला हवी. असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
“तुम्हाला कसं काय जमतं बुवा ?” शितल म्हात्रेंचा सुषमा अंधारेंना खोचक टोला
तसेच मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी 29 ऑगस्ट 2019 रोजी वर्षा बंगल्यावर गेले होते. त्यानंतर त्यांनी हा बंगला 15 जुलै रोजी सोडला. परंतु त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा हा 28 जुलैला दिला होता. त्यामुळे वर्षा बंगला सोडताना जो काही इन्वेंट केला गेला. तो फक्त लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी केला असा आरोप देखील त्यांनी लावला आहे.
“….त्यात निरागसतेला ओढू नका हो..!”; शिवतीर्थावरील टिकेनंतर श्रीकांत शिंदेंच उद्धव ठाकरेंना पत्र
ज्यावेळी नारायण राणे यांनी शिवसेना सोडली होती. त्यावेळी मी दवाखान्यात असताना देखील आम्हाला कणकविली मध्य़े प्रचार करण्यासाठी मातोश्रीवरून आदेश देण्यात आले होते. तसेच राज ठाकरेंच्या वेळी देखील त्यांच्याविरोधात आम्हाला आंदोलने करण्याचे आदेश दिले होते. तसेच सदा सरवणकर यांच्यावेळीचा अनुभव तसा फार वाईट होता. त्यावेळी त्यांनी आम्हाला मनोहर जोशींच्या घरावर हल्ला करण्यास सांगितले होते. तसेच त्यांच्या खाली पेट्रोल पंप आहेत. त्यांना देखील आग लावण्याचे आदेश त्यावेळी देण्यात आले होते. असं देखील राहुल शेवाळे यांनी म्हटलं आहे.
Read also
- “रूपया गिरता जा रहा है, मोदीजी को मजा आ रहा है”; राष्ट्रवादीने डिवचलं
- अखेर ठरलं..! ‘धनुष्यबाण गोठवलं तर ठाकरे ‘या’ चिन्हांवर लढवणार निवडणुक
- शिवसेना नेमकी कुणाची ? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? निवडणुक आयोगाचा निर्णय?
- “सुषमाताई..! आमच्यासारख्या जुन्या शिवसैनिकांना निष्ठा शिकवत असतील तर…”; शुंभुराज देसाई
- ‘ना खाऊंगा ना खाने दूंगा’ म्हणणाऱ्या मोदींच्या रेल्वे मंत्रालयात चार लाख डॉलरची लाच ; राष्ट्रवादीचा आरोप