मुंबई : आज संपुर्ण जगभरात ८ मार्च ला जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जात आहे. आज देशभरात विविध ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यातच राज्यातील राजकीय नेत्यांनीही जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत. यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महिला दिनानिमित्त एक पत्र लिहिलं आहे.
हेही वाचा…“विरोधकांना माफ करणं हाच आमचा बदला, ” फडणवीसांकडून सुचक विधान
राज ठाकरे यांनी लिहिलेल्या आपल्या पत्रात असं म्हटलं आहे की, सगळ्या चौकटी मोडून, आज सर्वच क्षेत्रामध्ये स्त्रियांची जी घौडदौड सुरु आहे ती थक्क करणारी आहे. आज ग्रामीण भागातील असो की शहरी भागातील इथल्या मुलींना उच्च शिक्षणाची स्वताच करिअर घडवायची प्रचंड ओढ आहे. त्यासाठी त्या घरापासून लांब, इतर शहरांत किंवा परदेशांत नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने सहज स्थिरावत आहेत. आणि जिथे जातील तिथे स्वतःचा ठसा उमटवत आहेत. हे चित्र आनंददायी आहे.
हेही वाचा..प्रामाणिकपणे शास्तीकर भरलेल्या मिळकतधारकांनाही लाभ द्या..! आमदार महेश लांडगे यांची महापालिका प्रशासनाला आग्रही मागणी
२००, १५० वर्षांपूर्वी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळावा म्हणून प्रचंड संघर्ष करावा लागत होता अशी परिस्थिती होती. आणि त्याच समाजात मोठमोठ्या उद्योगसमूहांच्या व्यवस्थापनापासून ते जागतिक अर्थकारणात उलाढाली करणाऱ्या संस्थामध्ये मोठ्या पदावर स्त्रिया कार्यरत आहेत. इतकंच काय देशाची अर्थव्यवस्था परराष्ट्र व्यवहार, सीमाचं संरक्षण ते थेट राष्ट्रपतीपदी स्त्रिया आपला ठसा उमटवत आहेत. आणि हे सर्व त्यांनी निव्वळ स्वकर्तृत्वावर कमावलं आहे. म्हणूनच आता स्त्रियांनी आता राजकारणात देखील मोठ्या प्रमाणावर यायला हवं.
हेही वाचा..पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरण हद्दीतील ‘प्रॉपर्टी कार्ड’चा विषय लागणार मार्गी..! आमदार महेश लांडगे यांनी मांडली लक्षवेधी सूचना
जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवणं हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं ध्येय आहे, आणि हे साध्य करायचं असेल तर स्त्रियाचा सहभाग देखील तितकाच महत्वाचा आहे, ह्याची आम्हाला जाणीव आहे. म्हणूनच विविध क्षेत्रांत स्वतःला सिद्ध करणाऱ्या स्त्रियांनी राजकारणात यावं, त्यांना संधी देण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना उत्सुक आहे. पुन्हा एकदा सर्व महिलांना, जागतिक महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
#जागतिकमहिलादिन#InternationalWomensDay2023 #WomensDay #InternationalWomensDay #महिला_दिवस pic.twitter.com/SQreucncNX
— Raj Thackeray (@RajThackeray) March 8, 2023
Read also
- हेही वाचा…“मंत्री तुपाशी, शेतकरी उपाशी, नुकसान भरपाई जाहीर करा,” विरोधकांच्या राज्य सरकारच्या विरोधात घोषणा
- हेही वाचा..भाजप आणि राष्ट्रवादीची युती होणार ? राजकीय चर्चांना उधान
- हेही वाचा..“४० आमदार आणि १३ खासदार सांभाळता आले नाही, ते देश काय सांभाळणार”?
- हेही वाचा..” देशात लोकांची हुकूमशाही आहे, कुणा पंतप्रधानांची हुकूमशाही नाही”,प्रणीती शिंदेंचा मोदींवर हल्लाबोल
- हेही वाचा…” मग इम्तियाज जलीलबरोबर जाऊन बिर्याणी खाणार का ?” खैरेंचा संजय शिरसाट यांना खोचक सवाल