मुंबई : देशात एव्हाना राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांचा होत असलेला गैरवापर आणि राजकीय परिस्थितीबाबत विरोधकांनी आक्रमक पवित्रा हाती घेतला आहे. यावरून विरोधक सत्ताधारी पक्षावर कडाडून टिकास्त्र सोडत आहेत. यातच काॅंग्रेसच्या आमदार प्रणीती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. लोकशाही ही लोकांची शाही असते. लोकांची हुकूमशाही असते, कोणत्या पंतप्रधानांची हुकुमशाही नसते, अशा तिखट शब्दात प्रणीती शिंदे यांनी मोदींवर टिका केली आहे.
हेही वाचा…“चोरमंडळ या एका शब्दाने शेतकऱ्याला विधीमंडळातूनच गायब केलं,” राजु शेट्टीही सरकारवर भडकले
काॅंग्रेसनेच सध्या हात से हात जोडो अभियान सुरू केले आहे. त्या अभियानाद्वारे काॅंग्रेसचे नेते लोकांच्या घरोघरी जाऊन आपल्या पक्षाबाबत जागृती करीत आहेत. त्या अभियानाच्या निमित्ताने त्यांनी बोलतांना मोदींवर टिका केली आहे.
हेही वाचा…“अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान, तर दुसरीकडे राजकीय धुळवड जोरात”
आम्ही मदतीला नाही आलो, तर आमचा कान धरून आम्हाला खाली बसवा. तो तुमचा अधिकार आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा आणि लोकशाहीचा तो अधिकार आहे. कारण ही लोकांची शाही आहे, लोकशाही आहे, ही लोकांची हुकूमशाही आहे, कुणा पंतप्रधानांची हुकूमशाही नाही. आम्ही तुमचे नोकर आहोत. मी आमदार माझ्या घरी असेेन. पण इकडे आम्ही तुमचे सेवक आणि नोकर आहोत. आम्ही तुमच्यापेक्षा मोठे नाहीत. हे तुम्ही कधी विसरू नका. घाबरू नका. ताठ मानेनं जगा. असं शिंदेंनी सांगितलं.
Read also
- हेही वाचा…” मग इम्तियाज जलीलबरोबर जाऊन बिर्याणी खाणार का ?” खैरेंचा संजय शिरसाट यांना खोचक सवाल
- हेही वाचा…“विरोधकांना माफ करणं हाच आमचा बदला, ” फडणवीसांकडून सुचक विधान
- हेही वाचा..प्रामाणिकपणे शास्तीकर भरलेल्या मिळकतधारकांनाही लाभ द्या..! आमदार महेश लांडगे यांची महापालिका प्रशासनाला आग्रही मागणी
- हेही वाचा..पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरण हद्दीतील ‘प्रॉपर्टी कार्ड’चा विषय लागणार मार्गी..! आमदार महेश लांडगे यांनी मांडली लक्षवेधी सूचना
- हेही वाचा..फडणवीसांकडून ठाकरेंसोबतची कुटता संपवण्याचे संकेत, म्हणाले, “आमच्या मित्राला कुणीतरी भांग पाजली”