मुंबई : केंद्र सरकारकडून देण्यात येणारा पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत हप्त्याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी तहसिल मध्ये आले होते. पीएम किसान निधी योजनेअंतर्गत हप्त्याबाबत त्यांना केंद्र सरकारकडून हप्त्या दिला जातो आहे. याबाबत ते तहसिह कार्यालयामध्ये आले होते. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट पण केलं आहे.
“मी मुर्ख आहे का? मी पण डॉक्टर आहे?” हाफकीनच्या मुद्द्यावरून भडकले सावंत
राजू शेट्टी यांनी केलेल्या आपल्या ट्विटमध्ये असं म्हटलं आहे की, पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दिला जाणारा दोन हजार रूपयांचा अकरावा हप्ता 31 मे रोजी माझ्या खात्यात जमा झाला. मी लोकसभेचा माजी सदस्य असल्याने या योजनेसाठी केंद्र सरकारच्या धोरणानुसार अपात्र असूनही हा सन्मान निधी माझ्या खात्यावर जमा होत आहे.
अमित शहा मुंबईत, भाजपचे सर्व नेते उपस्थित, पंकजा मुंडे गायब? राजकीय वर्तुळात चर्चा
याआधी मी स्वत: 6 हप्ते जमा झाल्यानंतर 12 हजार रूपयाचा धनादेश शासनास परत करून या योजनेतून मला अपात्र करण्याबाबत पत्र दिले होते. तरीही आज अखेर 11 हप्ते नियमीत जमा झालेले आहेत. आज पुन्हा शिरोळ तहसिलदार अपर्णा मोरे धुमाळ यांना भेटून या योजनेतून अपात्र करण्याबाबत सुचविले. मी वारंवार सांगूनही माझ्या खात्यावर पैसे यायचे थांबत नाहीत आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांनी अनेक हेलपाटे घातले तरीसुद्धा त्यांचे पैसे येत नाहीत, काय गौडबंगाल आहे कळत नाही असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दिला जाणारा दोन हजार रुपयांचा अकरावा हप्ता 31 मे रोजी माझ्या खात्यात जमा झाला. मी लोकसभेचा माजी सदस्य असल्याने या योजनेसाठी केंद्र सरकारच्या धोरणानुसार अपात्र असूनही हा सन्मान निधी माझ्या खात्यावर जमा होत आहे. याआधी मी स्वत: ६ हप्ते जमा pic.twitter.com/hBT2o1oQGl
— Raju Shetti (@rajushetti) September 6, 2022
Read also
- “स्वत: ला पक्षात उमेदवारी मिळेना अन् बारामती जिंकणार म्हणे”; रूपाली पाटील
- “ज्याच्याबरोबर जास्त आमदार आणि खासदार त्यांंचाच शिवाजी पार्कवर दसरा मेळावा”
- “बारामतीत कुणीही आलं तरी काही फरक पडत नाही”
- “अहमदशाह, आदिलशहा, कुतुबशहा आता अमित शाह, दिल्लीवरून असे किती…;” शिवसेनेने भाजपला डिवचलं
- “अमित शहा उद्धव ठाकरेंना खोटे म्हणत असतील तर ही चीड आणणारी बाब”