पुणे : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे बारामतीमधून सातत्याने विजयी होत आहेत. बारामतीची जागा जिंकण्यासाठी भाजपकडून अनेक नेते बारामतीत येऊन गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील बारामती मतदार संघात येऊन गेले आहेत. यावेळी केंद्रीय मंत्री निर्मला सितारमण बारामती दौऱ्यावर येत आहेत. त्याआधी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामतीचा दौरा करीत आहेत.
अमित शहा मुंबईत, भाजपचे सर्व नेते उपस्थित, पंकजा मुंडे गायब? राजकीय वर्तुळात चर्चा
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सध्या बारामती दौऱ्यावर आहेत. त्यासाठी त्यांचं कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केलं आहे. 2024 ची लोकसभेची निवडणुक भाजप एकहाती जिंकेल आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप 400 जागा जिंकेल असा दावा त्यांनी बारामती याठिकाणी केला आहे. तसेच बारामतीचा गड उद्धवस्त करू असा निर्धार देखील त्यांनी बोलून दाखवला आहे. यावरून आता राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी त्यांच्यावर किमान शब्दात कमाल अपमान केला आहे.
शिक्षकांवर आरोप करणारा आमदार पोहचला थेट शाळेत, खिचडीवर ताव मारला अन्….
देशात अनेकजण निवडणुका 40 40 वर्षे जिंकेल. मात्र त्यांचे गड मोदींच्या नेतृत्वात उध्वस्त झाले. बारामतीचाही गड उध्वस्त करणार. आतापर्यंत कधीही मोठी लढाई बारामतीत झाली नाही. एवढी मोठी लढाई येत्या निवडणुकीत होईल. असा इशारा बावनकुळे यांनी दिला आहे. त्यानंतर रूपाली पाटील म्हणाल्या की, स्वत: ला पक्षात उमेदवारी मिळेना अन् बारामती जिंकणार म्हणे, त्याचबरोबर 50 अधिक 2 कुळे तसेच बाहुला असं हॅशटॅग करीत त्यांनी निशाणा साधला आहे.
“गणपतीने अमित शहांना सद्बुद्धी द्यावी, त्यांनी देशासाठी काम करावं, देश विकण्यासाठी नाही”
दरम्यान, सध्या बारामतीत फिरत असताना लोकांचा उत्स्फुर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. पक्षाची संघटनात्मक ताकद वाढत आहे. पहिल्या टप्प्यात 16 लोकसभा मतदारसंघात दौरे करणार आहे. 18 महिन्यांसाठी निर्मला सितारमण यांची बारामती प्रभारी म्हणून नियुक्ती कऱण्यात आली आहे. त्यांचे अनेक दौरे होतील. संघटन, गरीब कल्याणाच्या योजना पोहोचवणे यावर भर असेल असं देखील बावनकुळे म्हणाले.
Read also
- “ज्याच्याबरोबर जास्त आमदार आणि खासदार त्यांंचाच शिवाजी पार्कवर दसरा मेळावा”
- “बारामतीत कुणीही आलं तरी काही फरक पडत नाही”
- “अहमदशाह, आदिलशहा, कुतुबशहा आता अमित शाह, दिल्लीवरून असे किती…;” शिवसेनेने भाजपला डिवचलं
- “अमित शहा उद्धव ठाकरेंना खोटे म्हणत असतील तर ही चीड आणणारी बाब”
- “मी मुर्ख आहे का? मी पण डॉक्टर आहे?” हाफकीनच्या मुद्द्यावरून भडकले सावंत