दिल्ली : शिवेसेना आणि शिंदे गटात शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा घेण्यावरून चढाओढ सुरू आहे. हा वाद आता शिगेला पोहचला असताना भाजपचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी उडी घेतली आहे. ज्याच्याबरोबर 40 आमदार त्यांंचाच दसरा मेळावा शिवाजी पार्कवर व्हावा, असं अजब वक्तव्य रावसाहेब दानवेंनी केलं आहे. यामुळे आता शिवसेना आणि भाजपमध्ये हा वाद रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.
शिक्षकांवर आरोप करणारा आमदार पोहचला थेट शाळेत, खिचडीवर ताव मारला अन्….
ज्या शिवसेनेला लोकांनी मतदान केलं आणि त्यांचे आमदार निवडुन आले आहेत. ज्या बाजुने जास्त आमदार आणि खासदार असतील त्या शिवसेनेला दसरा मेळाव्याची परवानगी मिळावी. शेवटी निर्णय हा कोर्ट करेल. शिवसेनेचं चिन्ह असलेल्या धनुष्यबाणावरून सध्या रस्सीखेच सुरू आहे. पक्षाचे चिन्ह आल्याशिवाय निवडणूका होणार नाहीत. सुप्रिम कोर्ट योग्य तो निर्णय देईल, असं दानवे म्हणाले.
“गणपतीने अमित शहांना सद्बुद्धी द्यावी, त्यांनी देशासाठी काम करावं, देश विकण्यासाठी नाही”
अमित शहांमुळे भाजप कार्यकर्त्यांना लढण्याचं बळ मिळेल. उद्धव ठाकरेंनी आम्हाला धोका दिला. इतकच नाही तर त्यांनी जनतेलाही धोका दिला. अमित शहा यांनी कोणताही शब्द शिवसेनेला दिला नव्हता. निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावानं शिवसेनेनं मतं मागितली. नंतर आम्हाला धोका दिला. उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात कामं केली नाहीत. 2 वर्षे मुख्यमंत्री राहिले पण साधं मंत्रालयामध्येही ते गेले नाहीत. अन् आता डायलॉगबाजी करत आहेत. गवताला भाले फुटतील, केसाला भाले फुटतील.. काय डायलॉगबाजी करतात, असा टोला रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
“आम्ही पाठवलेली यादी रद्द केली, अन् इडी सरकार येताच..;” नाना पटोलेंचा राज्यपालांवर निशाणा
2014 ला भाजप लढला तेव्हा 30 वर्षानंतर एकहाती सत्ता आली. निवडणूक जिंकण्यासाठी जबाबदारी दिली जाते. तशीच बारामतीची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर दिलीय. माझ्यावर पण जबाबदारी दिली आहे. आम्हाला विश्वास आहे की बारामतीही भाजपचा उमेदवार विजयी होईल, असं दानवे म्हणाले.
Read also
- “बारामतीत कुणीही आलं तरी काही फरक पडत नाही”
- “अहमदशाह, आदिलशहा, कुतुबशहा आता अमित शाह, दिल्लीवरून असे किती…;” शिवसेनेने भाजपला डिवचलं
- “अमित शहा उद्धव ठाकरेंना खोटे म्हणत असतील तर ही चीड आणणारी बाब”
- “मी मुर्ख आहे का? मी पण डॉक्टर आहे?” हाफकीनच्या मुद्द्यावरून भडकले सावंत
- अमित शहा मुंबईत, भाजपचे सर्व नेते उपस्थित, पंकजा मुंडे गायब? राजकीय वर्तुळात चर्चा