मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांची काही दिवसांपूर्वी भेट झाली होती. जवळपास 3 तासांच्या या भेटीत वेगवेगळ्या मुद्यांवर चर्चा झाल्याचे सांगितले जाते. या भेटीवरून राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. यातच आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी 2024 मध्ये नरेंद्र मोदीच पंतप्रधान बनणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीवर विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती. कोणी कितीही रणनीती आखू द्या, आताही नरेंद्र मोदीच आहेत आणि 2024 मध्येही मोदीच असतील, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. आता आठवलेंनी मोदींना आंबेडकरवादी म्हणत तेच पुन्हा पंतप्रधान होतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.
प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी ;
2024 मध्ये प्रधानमंत्री बनणार आहेत नरेंद्र मोदी !
नरेंद्र मोदी आहेत आंबेडकरवादी;
मग का प्रधानमंत्री बनणार नाहीत नरेंद्र मोदी? pic.twitter.com/KW8QL1rcAB— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) June 13, 2021
रामदास आठवलेंनी प्रशांत किशोर आणि शरद पवारांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर खास चारोळी शेअर केली आहे.
‘प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी; 2024 मध्ये प्रधानमंत्री बनणार आहेत नरेंद्र मोदी!, नरेंद्र मोदी आहेत आंबेडकरवादी; मग का प्रधानमंत्री बनणार नाहीत नरेंद्र मोदी?’ अशी चारोळी रामदास आठवलेंनी ट्वीट केली आहे. त्यांची ही पोस्ट व्हायरल होत आहे.
Read Also :
- ‘…म्हणून महाराष्ट्रात पेट्रोल सर्वात महाग आहे’, पेट्रोलियममंत्र्यांनी सांगितले कारण
- ‘…तर येत्या आठ दिवसांत पुन्हा कडक निर्बंध लावणार’
- गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर पाळत, पोलिसांना तपासाचे आदेश
- कंत्राटदाराला घातली कचऱ्याने आंघोळ, संतप्त शिवसेना आमदाराचे प्रताप
- अभय बंग महान सामाजिक नेते, त्यांच्यामुळेच राज्य व्यसनमुक्त झाले; वडेट्टीवारांचा टोमणा