मुंबई – मागील काही दिवसांपासून ‘मातोश्री’च्या वक्रदृष्टीमुळे शिवसेनेचे कोकणातील नेते आणि माजी मंत्री रामदास कदम राजकारणापासून अलिप्त होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कदम यांच्यावर नाराज होते. मात्र, आता ही नाराजी दूर झाली आहे. कारण, १४ मे रोजी उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी रामदास कदम यांना निमंत्रण आल्याची माहिती खुद्द कदम यांनीच दिली. आणि अशातच उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू असलेले मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून रामदास कदमांचे शिवसेनेत राजकीय पुनर्वसन होण्याचे संकेत मिळाले आहे. त्यामुळे रामदास कदम लवकरच नव्या जोशाने शिवसेनेत दुसऱ्या इनिंगला सुरुवात करणार असल्याची चर्चा रंगली आहे.
तुमच्या मनुवृत्तीची डाळ कधीही शिजणार नाही, त्यामुळे सुधरा; रोहित पवारांचा भाजपला सल्ला
रामदास कदम यांनी लिहिलेल्या जागर कदम वंशाचा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे पार पडला. . यावेळी एकनाथ शिंदे यांनी भर सभेत रामदास कदम यांच्या पुनर्वसनाचे संकेत दिलेत. भाई तुमची आम्हाला आणि विधिमंडळातील युवा पिढीला खूप गरज आहे. रामदास भाई तुम्ही आता केवळ साहित्यिक बनू नका. बाळासाहेबांच्या छत्रछायेत वाढलेले तुम्ही शिवसेनेचे फायरब्रॅन्ड नेते आहात. तुमची आम्हाला आणि समाजाला खूप गरज आहे. अनेक कठीण प्रसंगात पक्षासाठी झोकून तुम्ही काम केले. तुम्ही डोक्यात काही ठेवू नका. शिवसेनेत सेकंड इनिंग दमखमाने सुरूवात करा अशी आमची इच्छा आहे. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय असलेल्या रामदास भाईंनी आयुष्यभर संघर्ष करून राज्याचा विरोधी पक्षनेता, पर्यावरण मंत्री अशी मानाची पदे भूषवली आहेत. कदम वंशाचे नाव त्यांनी नव्या उंचीवर पोहोचवले असल्याचे, एकनाथ शिंदे म्हणाले.
“कृपा करुन शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घेऊ नका”; अजित पवारांचं शेतकऱ्यांना आवाहन
गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई म्हणाले, ‘भाई तुम्ही आमच्यासाठी ज्येष्ठ आहात. तुमच्याकडून आम्हाला सदैव प्रेरणा मिळत असते. नवी दिशा मिळते. त्यामुळे तुम्ही विधिमंडळात येत चला. आम्हाला तुमच्या आधाराची गरज आहे. नेहमीच आधार वाटतो.
अॅलेक्साला स्वीच ऑफ करता येईल, पण रोहित पवारांना नाही
या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला शिवसेना नेते गजानन किर्तीकर, शेकापचे आमदार जयंत पाटील, आमदार योगेश कदम, जिल्हा परिषद सदस्य अरुण कदम, युवा सेनेचे सिध्देश कदम यांच्या सह सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती आजी माजी सदस्य, खेड नगरपरिषदेचे माजी नगरसेवक व कदम कुटूंबीयासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
Read also:
- भाजपकडून शिवसेना-राष्ट्रवादीला सुरुंग; असंख्य कार्यकर्त्यांनी ‘कमळ’ घेतले हाती
- संभाजी महाराज जन्मोत्सव कार्यक्रमांच्या गाण्यावर थिरकले, शिवसेना आमदार संजय गायकवाड
- हिंदूजननायक शिवसेना प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे’; शिवाजीराव आढळराव पाटलांनी दिली नवी उपाधी
- राष्ट्रवादी -भाजप युतीच्या चर्चेला जोर; प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यक्रमाला भाजपच्या मुख्यमंत्र्यांची हजेरी
- “हिंदुत्वाच्या अग्नीशी खेळण्याचा प्रयत्नही करु नका”; अकबरूद्दीन ओवेसीला मनसेचा इशारा