पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्य़क्ष शरद पवारांवर राज ठाकरे यांनी अलिकडेच हिंदु धर्म आणि नास्तिकेवरून भाष्य केलं होतं. त्याचा धागा पकडत भाजपने शरद पवारांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपने एक जुना व्हिडिओ ट्विट करत शरद पवारांवर निशाणा साधला आहे. त्यात व्हिडीओमध्ये शरद पवार यांनी हिंदु देवी देवतांचे बाप काढालेत. असा आरोप भाजपने केला आहे. त्यावर आता राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार रोहित पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
राष्ट्रवादीने सुरा खुपसला’ हा नाना पटोलेंचा आरोप चुकीचा – जयंत पाटील
अस्पृश्यतेच्या मनोवृत्तीला ठेचण्यासाठी संत ज्ञानोबा माउलींपासून संत तुकोबा, संत गाडगेबाबा, शाहू-फुले-आंबेडकरांपर्यंत सर्वच महामानवांनी सामाजिक चळवळ उभी केली. अण्णाभाऊ साठे , नामदेव ढसाळ, जवाहर राठोड यासारख्या साहित्यिकांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून अस्पृश्यतावादी मानसिकतेवर आपल्या लेखणीतून घणाघात केला आणि समाजाला अन्यायाची जाण करून दिली. राजकीय आरोप करण्यासाठी भाजपने शरद पवारांनी दिलेल्या संदर्भाची मोडतोड करून नास्तिकता शोधली, परंतु त्याच संदर्भात अस्पृश्यतेवर केलेला घणाघात भाजपला दिसला नाही, हीच भाजपची खरी मानसिकता आहे. अशी टिका त्यांनी केली आहे.
जे कुटुंब प्रेमळ तिथं भांड्याला भांड लागतंच; नाना पाटोलेंच्या आरोपावर सुप्रिया सुळेंची सारवासारव
जवाहर राठोड यांच्या कवितेच्या संदर्भास नास्तिकतेचे नाव देऊन भाजपने त्यांची खरी मानसिकता तर दाखवलीच आहे शिवाय समाज सुधारणा चळवळीचा देखील अपमान केला आहे.
मुळात देव आणि धर्म यांना भाजपा नेहमीच केवळ आणि केवळ राजकारणाच्या चष्म्यातून बघत असल्याने खरा देव आणि खरा धर्म भाजपला कधी कळला नाही आणि कधी कळणारही नाही. त्यामुळेच पुरोगामी समाजसुधारकांना भाजपने आजवर नेहमीच पाण्यात पाहिले आहे. असाही आरोप त्यांनी केला.
तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यात संभाजी राजेंना प्रवेश नाकारला, अन्..;
दरम्यान, सर्वच समाजसुधारकांच्या काळात देखील अशा मनुवृत्ती होत्या आणि त्या मनुवृत्तींनी नेहमीच या सर्व समाजसुधारकांचा विरोध केला. आज माऊली, तुकोबा, गाडगेबाबा हे महापुरुष असते तर त्यांना देखील नास्तिक म्हणून भाजपने हिणवले असते, कारण हाच भाजपचा खरा विचार आणि चेहरा आहे. असो, हा महाराष्ट्र आहे.. इथे तुमच्या मनुवृत्तीची डाळ कधीही शिजणार नाही, त्यामुळे आता तरी सुधरा. असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.
Read also:
- संभाजी राजे राज्यसभेची निवडणुक अपक्ष म्हणून लढविणार; ‘या’ संघटनेची केली मोठी घोषणा
- “टोमणे सभेला अटी-शर्ती आहेत का?”, मनसेचा शिवसेनेला पुन्हा टोमणा
- “हेडलाईन मिळवण्यासाठी नाना पटोलेंचं वक्तव्य”; नाना पटोलेंच्या वक्तव्याला अजित पवारांचं प्रत्युत्तर
- शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन; दुबईवरून पार्थिव आणण्याचे प्रयत्न सुरू
- राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील वाद दिल्लीत जाणार! राष्ट्रवादी-भाजप संबंध उघडे पाडण्याचा पटोलेंचा इशारा