बुलढाणा : छत्रपती संभाजी महाराज उत्सव समिती आणि धर्मवीर आखाडाकडून बुलढाण्यात छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव साजरा केला जात आहे. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वात काल बुलढाण्यात भव्य दिव्य अशी रॅली देखील काढण्यात आली. सांयकाळी झालेल्या कार्यक्रमात आमदार संजय गायकवाड यांनी कार्यक्रमात डॉन्स केल्याने सध्या ते चर्चेत आले आहेत.
“नानांना अजून सवय नाही का? काकांच्या खंजीरांनी वंसतदादा, राजीव गांधी, सोनियाजी घायळ झालेत”
आमदार संजय गायकवाड यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्मोत्सव साजरा केला. मात्र संभाजी महाराजांच्या कार्यक्रमात संजय गायकवाड यांनी मनमुरादपणे गाण्यावर थिरकल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे अशा प्रकाराच्या कार्यक्रमात लोक प्रतिनिधींनीच अशा प्रकारे कृत्य करणे कितपत योग्य आहे, असा सवाल आता सर्वसामान्यांकडून विचारला जाऊ लागला आहे.
फक्त पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा…याला औरंगजेबाकडे..; नितेश राणेंचा ओवेसीला सज्जड दम
संजय गायकवाड याआधीही अशा गोष्टीमुळे चर्चेत आले आहेत. बुलढाणा अर्बन बॅंककडून प्रथमच मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी देखील त्यांनी स्पर्धकांसोबत सैराट मधील गाण्यावर झिंगाट डान्स केला होता. तेव्हा देखील ते चर्चेत आले होते. तसेच सांयकाळी झालेल्या कार्यक्रमात लोकांची प्रचंड गर्दी झाली होती. त्यावेळी संजय गायकवाड यांनी स्टेजवरच डान्स करण्यास सरुवात केली.
दरम्यान, सध्या राज्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्यासाठी राज्यातील सर्वच राजकीय पक्ष तयारी करीत आहेत. आगामी काही काळात महापालिकेच्या निवडणुका देखील होऊ घातल्या आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधींकडून अशाप्रकारेच्या कृती कितपत योग्य आहेत ते आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये स्पष्ट होईल.
Read also:
- मुंबै बॅंक बोगस निवडणुक प्रकरणात दरेकरांना अटक होण्याची शक्यता? मुंबई पोलीस दाखवणार खाक्या
- “तुम्हाला एवढीच हौस आहे, तर राजद्रोहाचा गुन्हा ओवैसींवर लावा”, ठाकरे सरकारला राम कदम यांचं खुलं आव्हान!
- राष्ट्रवादी -भाजप युतीच्या चर्चेला जोर; प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यक्रमाला भाजपच्या मुख्यमंत्र्यांची हजेरी
- “हिरवा अन् भगव्याच्या वादामध्ये मला रंग नसलेला भोंगा हवाय”; अमोल कोल्हेंच्या ‘या’ दमदार भाषणाची चर्चा
- “औरंगजेबाला याच मातीत गाडलं होतं, जे भक्त आहेत त्यांना..;” राऊतांचा अकबरूद्दीन ओवेसीला इशारा