उल्हासनगर : “एकत्र या आणि GST भरायला नकार द्या! मग मुख्यमंत्रीच काय पंतप्रधानही तुमच्याकडे येतील. एकीचे बळ दाखवा तुम्ही लढायला शिका!” असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धाकटे बंधू प्रल्हाद मोदी यांनी, उल्हासनगर ‘ट्रेड असोसिएशन’च्या वतीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात व्यापाऱ्यांना केले.
वीज बिलांची वसुली करा; पण, यशोमती ठाकूर म्हणतात…..
यावेळी, व्यापाऱ्यांनी आपल्या समस्या त्यांच्याकडे व्यक्त केल्या. तुम्ही या मागण्या केंद्रापर्यंत पोहोचवा अशी मागणी त्यांनी त्यांच्याकडे केली. तसेच, “इतर राज्यांत, लॉकडाऊनच्या काळात निर्बंधांचे उल्लंघन केल्याबद्दल दाखल केलेले गुन्हे मागे घेतले गेले आहेत. राज्यातही ते मागे घेण्यात यावेत,” अशी मागणी देखील करण्यात आली.
हेरगिरीच्या आरोपावरुन संसदेत संपूर्ण आठवडा उलटूनही गदारोळ कायम, विरोधक आक्रमक
“उल्हासनगर शहर हे निर्वासितांचे शहर असून, शहराला राज्य सरकारने विशेष निधी द्यावा, अशी यावेळी व्यपाऱ्यांकडून करण्यात आली. यावर, “रेफ्युजी म्हणून किती दिवस रडणार? आता लढायला शिका,” असे आवाहन करत मोदींनी, “शहराचा विकास होत नसेल आणि सरकारचे लक्ष वेधून घ्यायचे असेल, तर एकत्र येऊन जीएसटी भरायला नकार द्या, मुख्यमंत्रीच काय पंतप्रधानही तुमच्याकडे येतील,” असा हल्लाबोल केला आहे.
पुण्यातील मेट्रो आमच्यामुळेच आली; श्रेयासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपात झगडा-झगडी
राज्यात लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. आमची दुकाने उघडू द्या, आम्हाला निर्बंधांत सूट द्या, आमच्यासाठी काहीतरी उपाययोजना करा! अश्या वारंवार राज्य सरकारकडे मागण्या करून देखील राज्य सरकराने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे, राज्य सरकारविरोधात अनेक वेळा व्यापाऱ्यांनी निषेध नोंदवला आहे. त्यामुळे, यावेळी तरी राज्य सरकार व्यापाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देणार का?
Read Also :
- मी अपघाताने दिल्लीत आलो, प्रथम महाराष्ट्रातील प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देईल, नितीन गडकरी यांचा शब्द
- समाविष्ट २३ गावांमधील वीजयंत्रणा सक्षम करा; अजित पवारांचे निर्देश
- काँग्रेसवर होणाऱ्या टीकेला स्वातंत्र्य वारशाची गाथा सांगत प्रत्युत्तर देऊ – नाना पटोले
- अजित पवारांविरोधात सक्षम उमेदवार देऊ; चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा
- पंतप्रधान रोजगार योजनेतील ८८ टक्के उद्योगांना कोरोनाचा फटका – नारायण राणे