पुणे : वनाज ते आनंदनगर या अवघ्या १ किलोमीटर मेट्रो मार्गाची चाचणी घेण्यात आली. मात्र, त्यावरून श्रेयवादाची लढाई चांगलीच रंगली आहे. पुण्यातील मेट्रो आम्हीच बनवली, असा टाहो आता राष्ट्रवादी, भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांनी फोडला आहे. सगळ्या मेट्रोचेच श्रेय घेण्याची राजकीय धडपड सुरू झाली आहे. परंतू, काल पार पडलेल्या मेट्रो ट्रायल रन कार्यक्रमात कॉंग्रेसचे कोणी उपस्थित नव्हते. त्यामुळे, मेट्रोचे खरे योगदाते कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
फडणवीस सरकारची चुक अजितदादांनी निस्सारली, २३ गावांच्या निर्णयाचे स्वागतच – प्रशांत जगताप
मेट्रोचा पहिला ठराव काँग्रेसच्या सत्ताकाळात झाल्याची आठवण प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी करून दिली. काँग्रेसची स्वप्नपूर्ती झाली. काँग्रेस नेत्यांनी मेट्रोचा पाठपुरावा केला. भूसंपादन, राज्य, केंद्र सरकारची मंजुरी, वित्तीय संस्थांची मदत या प्रक्रिया काँग्रेसनेच मंजूर करून घेतल्या असल्याचे जोशी यांनी म्हटले आहे. सन २०१४ नंतरच्या भाजप सरकारने दोन वर्षे पुणे मेट्रोकडे दुर्लक्ष केले, अन्यथा हा प्रकल्प यापूर्वीच पूर्ण झाला असता, अशी टीका जोशी यांनी केली.
महापालिका रणधुमाळी : भाजपने काय केले याची पोलखोल करा, राज ठाकरेंचे आदेश
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बळावर पुणे मेट्रो रूळावर आल्याचे म्हटले आहे. फुकटचे श्रेय लुबाडण्याची सवय असलेल्या भाजपच्या वाचाळवीरांनी कितीही वल्गना केल्या, तरी मेट्रोच्या इतिहासाची आठवण पुणेकर त्यांना करून देतील अशी टीका त्यांनी केली. राज्यात सत्ताबदल झाला व महाविकास आघाडीने मेट्रो प्रकल्पाला गती दिली. आता पुणेकर मेट्रोतून प्रवास करत असतील त्यावेळी महापालिकेतही सत्ताबदल झालेला असेल असा दावा जगताप यांनीही केला आहे.
काँग्रेसवर होणाऱ्या टीकेला स्वातंत्र्य वारशाची गाथा सांगत प्रत्युत्तर देऊ – नाना पटोले
कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी श्रेयासाठीचा वाचाळपणा केला असला तरी ज्येष्ठ नेत्यांनी मात्र सुज्ञपणा दाखवत राजकीय शेरेबाजी टाळली. मेट्रोच्या चाचणी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार, कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील या नेत्यांनी अन्य पक्षप्रमुखांची नावे घेत त्यांनाही मेट्रो प्रकल्पाचे श्रेय दिले. परंतू, ट्रायल रन कार्यक्रमाच्या बॅनरवर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या व्यतिरिक्त कोणाचाही फोटो नव्हता. मग काँग्रेस किंवा भाजपचे यात योगदान असेल तर त्यांचा फोटो का लावण्यात आला नाही?, असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे.
Read Also :
- समाविष्ट २३ गावांमधील वीजयंत्रणा सक्षम करा; अजित पवारांचे निर्देश
- अजित पवारांविरोधात सक्षम उमेदवार देऊ; चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा
- पंतप्रधान रोजगार योजनेतील ८८ टक्के उद्योगांना कोरोनाचा फटका – नारायण राणे
- परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ: साडेतीन कोटींच्या खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल
- राणेंचं तोंड बंद करण्याची ताकद प्रत्येक शिवसैनिकात, नारायण राणेंच्या टीकेला शिवसेनेच प्रत्युत्तर