माळेगाव: आगामी विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात स्थानिक सक्षम उमेदवार देण्याचे संकेत माझी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. माळेगाव येथे युवामोर्चा शाखा उद्घाटन भाजप संपर्क कार्यालय उद्घाटन युवा वॅारियर अभियानाच्या निमित्ताने चंद्रशेखर काळुंके यांनी पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते.
हे पण वाचा: तळीयेसाठी दुःखात सुखाची छोटी फुंकर! पुनर्वसनाची जागा झाली निश्चित
यावेळी रंजन तावरे, दिलीप खैरे, विक्रांत पाटील, गणेश भेगडे, किरण दगडे पाटील, अध्यक्ष ज्ञानेश्वर माने, प्रमोद डावरे आदी उपस्थित होते.
हे पण वाचा: मोदींच्या सांगण्यावरून दिल्लीत खलबतं, गडकरींनी पवारांची भेट घेऊन केली महत्त्वाच्या विषयावर चर्चा
बावनकुळे म्हणाले पवार यांच्या विरोधात स्थानिक सक्षम उमेदवार दिला जाईल. त्यांना विधानसभा निवडणुकीत तालुक्यातच गुंतवून ठेवण्यास प्राधान्य दिले जाईल. राज्यात अठरा ते पंचवीस वर्षे वयोगटातील सुमारे २५ लाख युवकांना युवा वॅारियर बनवणार आहे. हे अभियान २६ जानेवारीपर्यंत राज्यात सुरू राहणार आहे. उत्तर महाराष्ट्र दिवा वॅारियरच्या ३०० शाखा स्थापन करण्यात आले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील सर्व गावे वाड्यावस्त्या व प्रत्येक मतदान बुथवर युवा वॅारियर स्थापन करणार आहोत.
हे पण वाचा: जेव्हा गरज असेल तेव्हा केंद्राची मदत घेऊ, मात्र वेड्यावाकड्या मागण्या करून पॅकेज जाहीर करणार नाही!
फडणवीस आणि पंकजा मुंडेत बहिन भावाचे नाते
तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व पंकजा मुंडे यांच्या विरोधात माध्यमांमध्ये विसंगत माहिती देऊन तणाव निर्माण केला जात आहे. वास्तविक देवेंद्र फडणवीस व पंकजा मुंडे यांच्यात अंतर्गत वाद नसून दोघात बहिणभावाचे स्नेहाचे व प्रेमाचे नाते आहे, असे माजी उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे.
Read Also :
- पंतप्रधान रोजगार योजनेतील ८८ टक्के उद्योगांना कोरोनाचा फटका – नारायण राणे
- परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ: साडेतीन कोटींच्या खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल
- राणेंचं तोंड बंद करण्याची ताकद प्रत्येक शिवसैनिकात, नारायण राणेंच्या टीकेला शिवसेनेच प्रत्युत्तर
- शेकापचे ज्येष्ठ नेते ‘विधानसभेचे विद्यापीठ’ गणपतराव देशमुख अनंतात विलीन
- तळीयेसाठी दुःखात सुखाची छोटी फुंकर! पुनर्वसनाची जागा झाली निश्चित