मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त व तत्कालीन ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी क्रिकेट बुकी प्रकरणात खोटय़ा गुह्यात अडकवून साडेतीन कोटी रुपये वसूल केल्याच्या आरोपाप्रकरणी आज त्यांच्यासह तीन पोलीस अधिकारी, दोन शिपाई अशा एकूण २८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
हे पण वाचा: कायम पुराचा धोका असणाऱ्या गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावू – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
ठाण्याच्या ठाणे नगर पोलीस ठाण्यात व्यावसायिक केतन तन्ना याने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला. त्यामुळे आधीच खंडणीच्या विविध गुह्यांत अडकलेल्या परमवीर सिंह यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा: कोल्हापूरकरांनी सुनावले फडणवीसांना खडे बोल!
मुंबईच्या मरीन ड्राइव्ह व त्यानंतर ठाण्याच्या कोपरी पोलीस ठाण्यात व्यावसायिकांकडून खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह त्यांच्या पोलीस सहकाऱयांवर गुन्हे दाखल आहेत. त्यातच ठाण्यातील व्यावसायिक केतन तन्ना यांनी ठाणेनगर पोलीस स्थानकात परमबीर सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी धाव घेतली आहे.खोटय़ा गुह्यात अडकवून वरून करोडो रुपये वसूल केल्याचा आरोप तन्ना यांनी परमबीर सिंह व त्यांच्या सहकाऱयांवर केला आहे.
हे पण वाचा: दणका! ईडीचे अनिल देशमुखांना चौथे समन्स, न्यायालयानेही फेटाळली अटक न करण्याची याचिका
यामध्ये सिंह यांच्या इशाऱयावरूनच त्यांच्या सहकाऱयांनी आपल्याला धमक्या देऊन आपल्याकडून साडेतीन कोटी रुपये उकळल्याचा गंभीर आरोप तन्ना यांनी केला आहे. या प्रकरणात तत्कालीन गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दीपक देवराज, तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त एन. टी. कदम, तत्कालीन ठाणे खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख प्रदीप शर्मा, राजकुमार कोथमिरे, इतर दोन पोलीस शिपाई, गुंड रवी पुजारींसह २८ जणांची नावे एफआयरमध्ये नोंदवण्यात आली आहेत.
Read Also :
- राणेंचं तोंड बंद करण्याची ताकद प्रत्येक शिवसैनिकात, नारायण राणेंच्या टीकेला शिवसेनेच प्रत्युत्तर
- शेकापचे ज्येष्ठ नेते ‘विधानसभेचे विद्यापीठ’ गणपतराव देशमुख अनंतात विलीन
- तळीयेसाठी दुःखात सुखाची छोटी फुंकर! पुनर्वसनाची जागा झाली निश्चित
- जेव्हा गरज असेल तेव्हा केंद्राची मदत घेऊ, मात्र वेड्यावाकड्या मागण्या करून पॅकेज जाहीर करणार नाही!
- फडणवीस-ठाकरे आले पुन्हा एकत्र, अवघ्या ५ मिनिटांच्या चर्चेत दडलंय तरी काय?