मुंबई : १०० कोटी वसुलीप्रकरणी अडचणीत आलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली असून, सुप्रीम कोर्टात अटक होऊ नये म्हणून त्यांनी दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळल्यानंतर आता ईडीने त्यांच्या मुलाला आणि त्यांना कथित मनी लाँडरिंग प्रकरणी चौकशीसाठी पुन्हा नवीन समन्स जारी केले आहेत. तसेच, कोर्टाने त्यांना सोमवारी हजर राहण्यास सांगितले आहे.
तळीयेसाठी दुःखात सुखाची छोटी फुंकर! पुनर्वसनाची जागा झाली निश्चित
ईडीकडून याआधी देखील देशमुखांच्या मालमत्तांवर छापे मारले गेले होते. तसेच, चौकशीसाठी त्यांना ३ समन्स बजावले होते. मात्र, त्यांनी आरोग्याचे कारण देऊन चौकशीसाठी येणे टाळले. देशमुखांच्या पत्नी आरती देशमुख यांनाही समन्स बजावण्यात आले होते, पण त्यांनी वकिलांद्वारे ईडी कोर्टात कागदपत्रे दाखल केली. त्यामुळे, आता देशमुख पिता-पुत्रांना २ ऑगस्टला ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखव व्हावं लागेल.
दिल्लीत भेटले गडकरी-पवार, मोदींच्या सांगण्यावरून झाली “या” विषयावर चर्चा
The Enforcement Directorate (ED) has issued fresh summons to former Maharashtra home minister Anil Deshmukh and his son Hrishikesh Deshmukh for questioning in connection with an alleged money laundering case. The agency has asked them to appear before it on Monday. pic.twitter.com/qRr3u9BgK4
— ANI (@ANI) July 30, 2021
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी सीबीआयकडून अनिल देशमुखांशी संबंधित १२ ठिकाणांवर छापेमारी केली. यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, सांगली व अहमदनगर या ठिकाणांचा समावेश आहे. दुसरीकडे, न्यायालयानेही देखील सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यास नकार दिला. देशमुखांवरील आरोपांची सीबीआयतर्फे चौकशी सुरू आहे आणि अशावेळी हस्तक्षेप केला तर सत्य उघड करण्यात अडथळा येईल, असे सांगत न्यायालयाने देशमुख यांना दणका दिला होता.
जेव्हा गरज असेल तेव्हा केंद्राची मदत घेऊ, मात्र वेड्यावाकड्या मागण्या करून पॅकेज जाहीर करणार नाही!
तसेच, देशमुखांनी ईडीने या प्रकरणी अटक होऊ नये म्हणून कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने देशमुखांना कोणताही दिलासा न देत, ईडीने अटक करु नये ही मागणी देखील अमान्य केली. त्यामुळे, एकंदरीतच देशमुखांच्या पाठीमागे लागलेला अडचणींचा ससेमिरा लवकर संपणार नाही असं दिसत आहे. दुसरीकडे देशमुख कुटुंबीय नॉट रिचेबल आहे. त्यामुळे, आता अनिल देशमुख सोमवारी ईडीच्या चौकशीला हजर राहणार की नाही, हे पाहावे लागणार आहे.