मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर भाजप आक्रमक झाले आहे. भाजप महिला मोर्चाकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन करण्यात आले. यानंतर पत्रकार परिषद घेत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणात पीडितावर दबाव येण्याची शक्यता आहे, तसेच पुराव्यांशी देखील छेडछाड होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
पोलीस तपासानंतर सत्य समोर येईल, मात्र अद्याप एफआयआर दाखल झालेली नाही. या सर्व गोष्टी गुंतागुंतीच्या आणि संशयास्पद असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या.
पीडितेच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले असून, या प्रकरणाचे सत्य लवकरात लवकर समोर आणावे, अशी विनंती त्यांनी पोलिसांना केली.
रेणू शर्मा दोषी असेल तर तिला शिक्षा व्हावी किंवा धनंजय मुंडेंसह ज्यांनी आरोप केले आहेत, ते दोषी असतील तर त्यांना शिक्षा व्हावी. पीडित महिला आणि तिच्या कुटुंबावर दबाव येण्याची शक्यता आहे. तसेच या प्रकरणात पुराव्यांशी देखील छेडछाड होऊ शकते, अशी शक्यता चित्रा वाघ यांनी व्यक्त केली.
Read Also :
- दोन दिवसात मोठे हादरे देणार, चंद्रकांत पाटलांचा इशारा
- ‘मुख्यमंत्री ठाकरेंनी कधीच बाहुबलीचे राजकारण केले नाही’
- ‘असं सरकार चालवता येत नाही’, ‘त्या’ वक्तव्यावर फडणवीसांचे मुख्यमंत्र्याना प्रत्युत्तर
- ‘आप’ने महाराष्ट्रात उघडले खाते, मराठीत ट्विट करत केजरीवाल म्हणाले…
- विना अपघात सेवा देणार्या एसटी चालकांना मिळणार मोठे बक्षीस, अनिल परब यांची घोषणा