मुंबई : राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प हे गुजरातला पळवल्याचा आरोप करण्यात आला. यातच आता दुध क्षेत्रात देशातील आघाडीची असलेली महानंद डेअरी देखील गुजरातला विकली जात असल्याचे सध्या चित्र निर्माण झालंय. याचं कारण म्हणजे महानंदचे चेअरमन राजेश पराजणे यांच्यासह संचालक मंडळाने एकत्रितपणे राजीनामा दिला आहे. त्यामुळे महानंद एनडीडीबीकडे हस्तांतरित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सहकारी दुध महासंघ व्यवस्थापकीय संचालकांकडे पराजेणे यांचा राजीनामा पाठवण्यात आला आहे. यावरून शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक ट्विट केले आहे.
हेही वाचा…“कांदा निर्यात बंदीचा निर्णय फसवा,” विजय वडेट्टीवारांचा राज्य सरकारसह केंद्रावर जोरदार हल्लाबोल
गुजरातचे स्वामित्व घेण्यास महानंदला अखेर भाग पाडलेच. महानंदकडे असलेल्या मुंबईतील जमिनीवर डोळा असलेल्या दलालांनी महानंद जाणूनबुजुन तोट्यात आणत महानंदचा गेम केला. महाराष्ट्रात काय येईल याची गॅरंटी नाही पण महाराष्ट्रातून काय जाईल याची गॅरंटी देणारं हे राज्यसरकार गुजरातला अजून काय काय देणार? असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे.
जमिनीच्या काही तुकड्यांसाठी D फॉर दलाली करणे राज्यकर्त्यांना शोभत नाही. स्वतःला बाळासाहेबांचे वारसदार म्हणवून घेणारे आणि स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांचे अनुयायी म्हणवून घेणारे आता भाजपच्या D फॉर दलाली वर आवाज उठवण्याची हिंमत दाखवतील का? असा खोचक सवाल देखील रोहित पवार यांनी भाजपसह अजित पवार गटाला केला आहे.
हेही वाचा…जरांगेंना काडीचीही अक्कल नाही, सहकारी मित्राचाच जरांगे पाटलांवर जोरदार घणाघात
दरम्यान, मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प हे गुजरातला हलवण्यात आले. यातच आता राज्यतली प्रमुख सहकारी दुध संस्था महानंदचा कारभार गुजरातमधील एनडीडीबीतून चालवला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी दुध महासंघ म्हणजे महानंद एनडीडीबीला चालवण्यात देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला होता. संचालक मंडळाचा हा प्रस्ताव राज्य सरकारकडे याआधीच पाठवण्यात आलीची माहिती समोर आलीय.
#गुजरातचे स्वामित्व घेण्यास #महानंद ला अखेर भाग पाडलेच. महानंदकडे असलेल्या मुंबईतील जमिनीवर डोळा असलेल्या दलालांनी महानंद जाणूनबुजुन तोट्यात आणत महानंदचा #गेम केला.
महाराष्ट्रात काय येईल याची #गॅरंटी नाही पण महाराष्ट्रातून काय जाईल याची गॅरंटी देणारं हे राज्यसरकार गुजरातला अजून… pic.twitter.com/aS8GUmqSC5
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 22, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“महानंद आता गुजरातला विकलेय”, आमदार जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटने खळबळ
हेही वाचा…मुंबईतील चार लोकसभेसाठी ठाकरेंचे ‘हे’ शिल्लेदार ठरले, भाजप अन् शिंदे गटाला देणार मात ?
हेही वाचा…जरांगेंच्या मुलांमध्येही अंहकार, पाच गुप्त बैठका, अजय महाराजांचे जरांगेंवर काय काय आरोप ?
हेही वाचा..सुप्रिम कोर्टाचा भाजप सरकारला दणका..! चंदीगड महापौर निवडणूक गैरव्यवहार प्रकरण
हेही वाचा..अजय बोरसकर हा भोंदू महाराज, सरकारचा ट्रॅप, जरांगे पाटलांचं जोरदार प्रत्युत्तर