मुंबई : राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प हे गुजरातला पळवल्याचा आरोप करण्यात आला. यातच आता दुध क्षेत्रात देशातील आघाडीची असलेली महानंद डेअरी देखील गुजरातला विकली जात असल्याचे सध्या चित्र निर्माण झालंय. याचं कारण म्हणजे महानंदचे चेअरमन राजेश पराजणे यांच्यासह संचालक मंडळाने एकत्रितपणे राजीनामा दिला आहे. त्यामुळे महानंद एनडीडीबीकडे हस्तांतरित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सहकारी दुध महासंघ व्यवस्थापकीय संचालकांकडे पराजेणे यांचा राजीनामा पाठवण्यात आला आहे. यावरून शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केले आहे.
हेही वाचा…जरांगेंना काडीचीही अक्कल नाही, सहकारी मित्राचाच जरांगे पाटलांवर जोरदार घणाघात
मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प हे गुजरातला हलवण्यात आले. यातच आता राज्यतली प्रमुख सहकारी दुध संस्था महानंदचा कारभार गुजरातमधील एनडीडीबीतून चालवला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी दुध महासंघ म्हणजे महानंद एनडीडीबीला चालवण्यात देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला होता. संचालक मंडळाचा हा प्रस्ताव राज्य सरकारकडे याआधीच पाठवण्यात आलीची माहिती समोर आलीय.
हेही वाचा…जरांगे पाटलांचा सरकारच्या विरोधात पुन्हा एल्गार, तारिख अन् स्थळ ठरलं, सर्वात मोठं आंदोलन होणार
याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलंय की, मुद्दामहून रात्री ट्वीट करीत आहे. उद्या सकाळीच महानंद डेअरीत जा, डेअरीतून दूध विकत घ्या.. देवाला दुधाचा अभिषेक करा, गोड शिरा करा, जेवढं शक्य असेल तेव्हढं गोडधोडही करा… आता हे काय नवीन सांगतो आहे, असं म्हणाल ! हे सांगण्याचं कारण म्हणजे, महानंद आता गुजरातला विकलेय ! जय हो, महानंद की !
मुद्दामहून रात्री ट्वीट करीत आहे. उद्या सकाळीच महानंद डेअरीत जा, डेअरीतून दूध विकत घ्या.. देवाला दुधाचा अभिषेक करा, गोड शिरा करा, जेवढं शक्य असेल तेव्हढं गोडधोडही करा… आता हे काय नवीन सांगतो आहे, असं म्हणाल ! हे सांगण्याचं कारण म्हणजे, महानंद आता गुजरातला विकलेय !
जय हो, महानंद…— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 21, 2024
READ ALSO :
हेही वाचा…मुंबईतील चार लोकसभेसाठी ठाकरेंचे ‘हे’ शिल्लेदार ठरले, भाजप अन् शिंदे गटाला देणार मात ?
हेही वाचा…जरांगेंच्या मुलांमध्येही अंहकार, पाच गुप्त बैठका, अजय महाराजांचे जरांगेंवर काय काय आरोप ?
हेही वाचा..सुप्रिम कोर्टाचा भाजप सरकारला दणका..! चंदीगड महापौर निवडणूक गैरव्यवहार प्रकरण
हेही वाचा..अजय बोरसकर हा भोंदू महाराज, सरकारचा ट्रॅप, जरांगे पाटलांचं जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…“कांदा निर्यात बंदीचा निर्णय फसवा,” विजय वडेट्टीवारांचा राज्य सरकारसह केंद्रावर जोरदार हल्लाबोल