मुंबई – राज्यात राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापलं आहे. या निवडणुकीदरम्यान अनेक राजकीय घडामोडींनी वेग घेतला असल्याचे चित्र आहे. पक्षातील राजकीय नेत्यांनी निवडणुकीच्या प्रचारासाठी गाठीभेटी सुरु केल्या आहेत. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात भाजपावर निशाणा साधला आहे.
“महाराष्ट्राने आजवर असला लुच्चा मुख्यमंत्री पाहिला नाही”; किरीट सोमय्या
भाजपने संभाजीराजे यांना फसवलं असून स्वत:च्या स्वार्थासाठी भाजपाने संभाजीराजे छत्रपती यांची ढाल केली, असा गंभीर आरोपही राऊत यांनी केला आहे. याशिवाय राज्यसभा उमेदवारीवरून राऊतांची काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली आहे. आज ते मुंबईत बोलत होते.
“..म्हणून मी खासदारकीची निवडणुक लढवणार नाही;” संभाजी राजेंनी स्पष्ट केली भूमिका
भाजपने संभाजीराजांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपने स्वतःच्या उमेदवारीसाठी आणि स्वार्थासाठी संभाजीराजे छत्रपतींची ढाल केली आहे. या सर्व घडामोडींवर राज्य सरकारचे लक्ष आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार विजयी होणार आहेत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पुढे कॉंग्रेसवर नाराजी व्यक्त करताना ते म्हणाले, काँग्रेसने देशभरात अनेक ठिकाणी त्यांच्या पक्षातील नेत्यांची सोय केली आहे. काँग्रेसने राज्यातील उमेदवार दिला असता तर बरं झालं असतं. स्थानिक उमेदवारीमुळे काँग्रेसचे राजकीय वर्तुळात वजन कायम रहायला मदत झाली असती, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
हिंदु-मुुस्लिम ऐक्यासाठी तिरंगा यात्रा घेऊन अयोध्येला जाणार; बच्चू कडू
दरम्यान, राज्यसभा उमेदवारीसाठी संभाजीराजे छत्रपती यांनी अपक्ष लढण्याचे घोषित केले. मात्र त्यांनी शिवबंधन बांधण्यास नकार दिला. त्यामुळे शिवसेनेने कोल्हापुरातील शिवसैनिक संजय पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. दरम्यान, शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी खासदार संजय राऊत यांनी दोन दिवस कोल्हापूर दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी जाहीर सभा घेतल्या आहेत. याशिवाय त्यांनी कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांचीही भेठ घेतली आहे.
Read also:
- धनंजय महाडिकांचा उमेदवारी अर्ज दाखल; भाजपच्या तिन्ही जागा जिंकून येतील; महाडिकांचा दावा
- “मुख्यमंत्र्यांच्या बदनामीचा कट रचणाऱ्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल”
- आयुष्याची ४५ वर्षे सामाजिक, राजकीय जीवनात..; चंद्रकांत पाटलांचा सुप्रिया सुळेंबाबत जाहीरनामा
- “घसा ओरडुन पत्रकार परिषदा घेणाऱ्या किरीट काकांना राज्यसभेवर न घेतल्याने सामान्य जनता नाराज”
- मुंबई महापालिकेवर कमळ फुलणार; सट्टा बाजारात भाजपला सर्वात पसंती