मुंबई : आगामी काळात मुंबईसह राज्यात एकुण 15 महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यासाठी राजकीय पक्ष जोरदार तयारी करताना दिसत आहेत. अशातच आता मुंबई मनपा निवडणुकीबरोबर बुकींनी गुजरात निवडणुकीसाठी सुद्धा सट्टा बाजार सुरू केला आहे. यामध्ये भाजपला सर्वाधिक पसंत मिळत असल्याचं चित्र आहे.
मुंबई महापालिकेत राष्ट्रवादी काॅंग्रेस, शिवसेना, काॅंग्रेस आणि भाजप या प्रमुख पक्षांमध्ये लढत आहेत. यांच्यामध्ये 236 जागांसाठी लढत होईल. तर सट्टा बाजारानुसार भाजपला 120 जागांवर विजय मिळण्याचा खात्री आहे. तर शिवसेना फक्त 10 ते 30 जागांचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
पालकमंत्री बदलने म्हणजे बाजारातला भाजीपाला आहे का? उजनी धरण्याच्या पाण्यावरून भरणे भडकले
हिंदुत्वाची भूमिका घेतल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना या निवडणुकीत 5 ते 15 जागा मिळण्याची शक्यता आहे. या सट्टा बाजारात भाजपने 120 जागा जिंकल्याबद्दल बुकी प्रत्येक एक रूपयाच्या वर 1 रूपया द्यायला तयार आहे. तर 100 पेक्षा जास्त जागांवर भाजपच्या विजयावर सट्टा लावण्यासाठी बुकींना प्रत्येक रूपयावर 0.25 पैसे द्यावे लागतील. 110 जागांसाठी एक रूपयावर 55 पैसे इतकी शक्यता आहे.
“इतिहास विकुन नाही तर शिकुन वर आलोय”; सदाभाऊंचा अमोल मिटकरींना जोरदार प्रत्युत्तर
दरम्यान, शिवसेनेला 10 पैशांपासून ते 62 पैशांपर्यंत दर देण्यात आले आहेत. तर मनसेला 22 पैशांपासून ते 85 पैशांपर्यंत रेट देण्याची तयारी सुरू आहे. अशातच बुकींनी काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीला अद्याप कोणताही रेट दिलेला नाही. त्यामुळे या निवडणुकी सट्टा बाजारानुसार भाजपला जास्त जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Read also:
- “मुख्यमंत्रीपदाची इच्छा बोलल्यानंतर काही लोकांवर का आभाळ कोसळ्यासारखं झालं”?
- लोकसभेच्या निवडणुकीत MIM अन् वंचितने भाजपकडून 1 हजार कोटी रूपये घेतले; चंद्रकांत खैरे
- “बंद पडलेल्या कारखान्याला धुऊन खाण्याचे काही लोकांचे काम”; शरद पवारांचा रोख नेमका कुणाकडे ?
- “साई रिसॉर्टशी काहीही संबंध नाही, मग हा रिसॉर्ट कुणाचा”? सोमय्यांचा अनिल परबांना सवाल
- “मुख्यमंत्र्यांनी मान राखला नाही, असं बोलणं चुकीचं”; शाहु महाराजांचं गोप्यस्फोट