नाशिक : विधान परिषेदच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी सदाभाऊ खोतांवर जोरदार टिका केली. सदाभाऊ खोत यांना आता विश्रांतीची गरज असून त्यांनी आता राजकारणातून सन्यांस घ्यावा असा सल्ला मिटकरींनी सदाभाऊ खोतांना दिला. त्यावर आता सदाभाऊ खोत यांनी अमोल मिटकरी यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
“सोमय्यांना ‘अनैतिक’, ‘आक्रस्ताळे’, ‘अजागळ’ सारखे ‘अ’ कारातील विशेषणे लागू पडतात”
अमोल मिटकरी हे चांगले वक्ता असून त्यांनी वक्तव्याच्या जोरावर ते विधान परिषदेमध्ये आलेत. मी देखील वक्तव्य करत असताना कहाण्या सांगत विधान परिषदेमध्ये आलो नाही तर सामान्य जनतेच्या प्रश्नांवरती जीभेची तलवार चालवली आणि वास्तव काय आहे, हे मी मांडलं. मी वास्तवाशी लढत लढत विधान परिषदेवर आलो. अमोल मिटकरी वास्वावाशी लढत आले नाहीत. अमोल मिटकरी यांनी इतिहासाचा बाजार मांडला. अन् त्या बाजाराच्या शिदोरीवर ते आलेत, असा घणाघात सदाभाऊ खोतांनी केला.
“यावर शेंबडं पोर तरी विश्वास ठेवेल”? राऊतांच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटलांचं जोरदार प्रत्युत्तर
तसेच मी इतिहास विकुन याठिकाणी आलो नाही तर इतिहास शिकुन आलो आहे. असा टोला देखील त्यांनी लगावला आहे. सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी अशाच प्रकारे वागत असेल. तर आम्ही सरकारविरोधात निफाड याठिकाणी कांदा परिषद घेणार आहोत. या परिषदेमध्ये पुढची आंदोलनाची दिशा ठरविली जाईल. कांदा उत्पादक राज्यव्यापी आंदोलन त्याठिकाणी घोषीत करू , असा इशाराही त्यांनी दिला.
“८ वर्षात मी माझं डोकं कुणापुढं झुकू दिलं नाही”; पंतप्रधान नरेंद्र मोदी
दरम्यान, विधान परिषदेसाठी सदाभाऊ खोत यांना यावेळी विश्रांती घेण्याचा सल्ला भाजपकडून दिला आहे. त्यामुळे यावेळी सदाभाऊंचा पत्ता कट होणार हे निश्चित मानलं जात आहे. याबाबत टिका करताना अमोल मिटकरी यांनी सदाभाऊ खोत यांना आता राजकारणातून सन्यांस घ्यावा, असा सल्ला दिला होता.
Read also:
- “राणाबाई शनी मागे लागल्यावर मानसिक स्थिती ढासळते, तुम्हाला तपासणीची गरज”
- पाठीमागे लागलेला शनी घालवण्यासाठी हनुमान चालिसाचं पठण करणार ; नवनीत राणा
- “मुख्यमंत्र्यांवर बोलले की 5-10 ठिकाणी तक्रार, अन् पंतप्रधानांविरूद्ध बोलले की त्यांचा सन्मान”
- “हे दोन पैशाचे पोस्टर अन् आमचं तीन लाखाचं पोस्टर”; एकाच मंदिरात राष्ट्रवादी आणि नवनीत राणा
- “उद्धव ठाकरेंबाबत बोलताना भान ठेवा नाहीतर शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ”; सेनेचा सोमय्यांना इशारा