नागपुर : दिल्लीतील देखील आम्हाला हनुमानच्या मंदिरात हनुमान चालिसांचं पठण कऱण्याची परवानगी दिली होती. मात्र महाराष्ट्रात हनुमान चालिसा, तसेच रामाला इतका विरोध का केला जात आहे? हे मला समजत नाही. असा सवाल अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मु्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला. तब्बल ३६ दिवसांनी त्या दिल्लीहुन नागपुरात दाखल झाल्या. यावेळी त्यांनी हनुमान मंदिरात हनुमान चालिसाचं पठण देखील त्यांनी केलं.
“८ वर्षात मी माझं डोकं कुणापुढं झुकू दिलं नाही”; पंतप्रधान नरेंद्र मोदी
गेल्या ३५ दिवसानंतर आम्ही विदर्भात परत आलो आहे. मला समजत नाही की, हनुमान आणि रामाचं विरोध महाराष्ट्र का होत आहे. कारण दिल्लीमध्ये आम्ही रॅली काढली. त्याठिकाणी आम्हाला सुरक्षाही देण्यात आली. मंदिरात जाऊन आम्ही हनुमान चालिसाचं ही पठण केलं. मात्र आज महाराष्ट्रात माझ्यापाठीमागे जो शनी लागला आहे. त्यासाठी आम्ही हनुमान मंदिरात जाऊन महाआरती करणार आहे. असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.
एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची नोकरी जाणार? केंद्र सरकारकडून हालचाली सुरू
आम्ही हनुमान चालिसा म्हणणार असल्याने मुख्यमंत्र्यांनी पोलिसांची पुर्ण फौज आमच्याविरोधात उभी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जो कोणी हनुमान आणि रामाचं नाव घेईल, त्याला जेलमध्ये टाकण्याचं एकसुत्री काम सुरू आहे. येणाऱ्या काळात हनुमान आणि राम भक्त या मुख्यमंत्र्यांना धडा शिकवेल, मुख्यमंत्र्यांमुळे महाराष्ट्रात जे काही संकट आलं आहे. त्यामुळे शनी मंदिरात जाऊन महाराष्ट्रावर आलेले विघ्न दुर कऱण्यासाठी आम्ही प्रार्थना करणार आहोत. असं रवी राणा यांनी म्हटलं आहे.
“प्रत्येक आमदारकीची निवडणुक आली की माझ्या नावाची चर्चा होते”; पंकजा मुंडे
नवनीत राणा या दिल्लीहुन आज ४ च्या सुमारास नागपुरमध्ये दाखल होणार आहेत. यावेळी त्या रामनगर परिसरातील हनुमान मंदिरात त्या हनुमान चालिसांचं पठण करणार आहेत. त्यावेळी त्यांना पोलिसांनी काही अटी शर्ती घालण्यात आल्या आहेत. त्यानंतर त्यांना परवानगी देण्यात आली. मात्र यावेळी राष्ट्रवादी काॅंग्रेसलाही त्याठिकाणी पोलिसांकडून हनुमान चालिस पठण करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे नवनीत राणा यांचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे कार्यकर्ते यावेळी आमनेसामने येण्याची शक्यता आहे.
Read also:
- “मुख्यमंत्र्यांवर बोलले की 5-10 ठिकाणी तक्रार, अन् पंतप्रधानांविरूद्ध बोलले की त्यांचा सन्मान”
- “हे दोन पैशाचे पोस्टर अन् आमचं तीन लाखाचं पोस्टर”; एकाच मंदिरात राष्ट्रवादी आणि नवनीत राणा
- “उद्धव ठाकरेंबाबत बोलताना भान ठेवा नाहीतर शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ”; सेनेचा सोमय्यांना इशारा
- “सोमय्यांना ‘अनैतिक’, ‘आक्रस्ताळे’, ‘अजागळ’ सारखे ‘अ’ कारातील विशेषणे लागू पडतात”
- “यावर शेंबडं पोर तरी विश्वास ठेवेल”? राऊतांच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटलांचं जोरदार प्रत्युत्तर