मुंबई : गोपीनाथ मुंडे यांनी त्यापुर्वी निवडणुकीबद्दल माझ्या आणि धनंजय मुंडे यांच्याबाबत निर्णय घेतला की हे दोघेही निवडणुक लढणार. आज महाराष्ट्राला कळलं असेल की का ? धनंजय मुंडे यांच्या काही प्रश्न काळजीचे होते. त्यामुळे त्या प्रश्नांची उत्तरे आजपर्यंत मी दिली नाहीत. त्यावेळी धनंजय मुंडेला देखील माझ्याबरोबर आमदार केलं. त्यांच्यानंतर काय झालं? त्याचं उत्तर तो देऊ शकेल मी नाही देऊ शकेल असं भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. त्या लोकमत टॉकशो मध्ये बोलत होत्या.
पालकमंत्री बदलने म्हणजे बाजारातला भाजीपाला आहे का? उजनी धरण्याच्या पाण्यावरून भरणे भडकले
मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे, असं विधान केल्यानंतर माध्यमांच्या दृष्टीने लोकांनापर्यंत गेलं की पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री पदाची आकांशा आहे. आपण कुठेही काम करत असताना काही महत्वाकांक्षा घेऊन काम करत असतो. याबाबत मला नकारात्मक प्रतिक्रिया आल्या होत्या. त्याचं मला आश्चर्य वाटते. असंही त्या म्हणाल्या.
“इतिहास विकुन नाही तर शिकुन वर आलोय”; सदाभाऊंचा अमोल मिटकरींना जोरदार प्रत्युत्तर
मुख्यमंत्री पदाबाबत बोलल्यावर महाराष्ट्रावर किंवा काही लोकांनावर इतक काय आकाश कोसळ्याल्या सारखं झालं? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. याबाबत लोकांकडून मला कोणत्याही नकारात्मक प्रतिक्रिया आल्या नाहीत. तसेच त्यांना मुख्यमंत्री बनण्याची इच्छा आहे, असं विचारलं असतं . त्यांनी आपण ज्याठिकाणी आहोत त्याठिकाणीच बरं आहे, असं त्यांनी उत्तर दिलं.
“राणाबाई शनी मागे लागल्यावर मानसिक स्थिती ढासळते, तुम्हाला तपासणीची गरज”
दरम्यान, एखाद्या घटनेवर मी पटकन प्रतिक्रिया देत नाहीत. मी पत्रकारांना देखील बोलवत नाहीत. त्याविषयासाठी पत्रकार माझ्याकडे येतात आणि जे खरं आहे त्यावर मी बोलते. त्यालाचं खरं नेता म्हणतात, बाकी सगळे अभिनेते असतात. अशी खोचक टिप्पणी देखील पंकजा मुंडे यांनी केली.
Read also:
- लोकसभेच्या निवडणुकीत MIM अन् वंचितने भाजपकडून 1 हजार कोटी रूपये घेतले; चंद्रकांत खैरे
- “बंद पडलेल्या कारखान्याला धुऊन खाण्याचे काही लोकांचे काम”; शरद पवारांचा रोख नेमका कुणाकडे ?
- “साई रिसॉर्टशी काहीही संबंध नाही, मग हा रिसॉर्ट कुणाचा”? सोमय्यांचा अनिल परबांना सवाल
- “मुख्यमंत्र्यांनी मान राखला नाही, असं बोलणं चुकीचं”; शाहु महाराजांचं गोप्यस्फोट
- माझ्या वडिलांचा आदरच करतो, ते जे बोलले त्यावर..; शाहु महाराजांच्या वक्तव्यवर संभाजी राजेंची प्रतिक्रिया