पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील चांगलेच चर्चेत आले. त्यांच्यावर राजकीय नेत्यांनी टिकांचा भडीमार सुरू केला. तसेच त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्याची मागणी केली. मात्र झालेल्या या सर्व प्रकाराबाबत चंद्रकांत पाटलांनी दिलगिरी व्यक्त करत महिला आयोगाला एक पत्र लिहिलं आहे.
“साई रिसॉर्टशी काहीही संबंध नाही, मग हा रिसॉर्ट कुणाचा”? सोमय्यांचा अनिल परबांना सवाल
महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना चंद्रकांत पाटलांनी पत्र पाठवलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, आयुष्याची ४५ वर्षे सामाजिक, राजकीय जीवनात गेल्यानंतर स्वयंसिद्धा, Helpers of the Handicap, सावली, आई, संवेदना व वात्सल्य सारख्या संस्थांच्या मागे उभे राहून महिला सबलीकरणासाठी रात्रंदिवस प्रयत्न करणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या पक्षाचा प्रदेश अध्यक्ष असणारा मी. ज्या पक्षाच्या महाराष्ट्र विधानसभेत १२ महिला आमदार व देशाच्या लोकसभेत महाराष्ट्रातून ५ महिना खासदार आहेत. मला सुप्रियाताईबद्दल व महिलांबद्दल मनात अनादर नसताना ग्रामीण म्हणीचा वापर केल्यामुळे अपमानित व्हावे लागते यासारखे आयुष्यात दुःख नाही.
“मुख्यमंत्र्यांनी मान राखला नाही, असं बोलणं चुकीचं”; शाहु महाराजांचं गोप्यस्फोट
माझ्या ओबीसी बंधू भगिनींना राजकीय आरक्षण न मिळाल्यामुळे मी त्रागाने केलेल्या उच्चारात सुप्रियाताई किंवा समस्त माता भगिनींना अपमान झाला असल्यास मी दिलगिरी व्यक्त करतो. असं चंद्रकांत पाटलांनी पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भात वक्तव्य करताना चंद्रकांत पाटलांनी सुप्रिया सुळे यांना मसणात जाण्याची भाषा केली होती. त्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टिका झाली.
दरम्यान, चंद्रकांत पाटलांनी टिका केल्यानंतर शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी देखील याचाच धागापकडत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टिका केली होती. दरवाढ आटोक्यात येत नसेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा तुम्ही मसणात जा. तसेच हिमालयात जाऊन राजकीय संन्यास घ्या. अशा पद्धतीची टिप्पणी केली होती. त्यामुळे आता राजकीय नेत्यांनी एकमेकांनाबाबत बोलताना थोडा भान ठेऊन बोललं पाहिजे, अशा प्रतिक्रिया समाज माध्यमांतून उमटू लागल्या आहेत. तर चंद्रकांत पाटलांनी झालेल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली. तशी माफी दिपाली सय्यद देखील मागणार का? असा सवाल देखील यावेळी उपस्थित केला जात आहे.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांना लिहिलेले पत्र !@ChakankarSpeaks pic.twitter.com/3429F3qy6d
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) May 29, 2022
Read also:
- “घसा ओरडुन पत्रकार परिषदा घेणाऱ्या किरीट काकांना राज्यसभेवर न घेतल्याने सामान्य जनता नाराज”
- मुंबई महापालिकेवर कमळ फुलणार; सट्टा बाजारात भाजपला सर्वात पसंती
- “मुख्यमंत्रीपदाची इच्छा बोलल्यानंतर काही लोकांवर का आभाळ कोसळ्यासारखं झालं”?
- लोकसभेच्या निवडणुकीत MIM अन् वंचितने भाजपकडून 1 हजार कोटी रूपये घेतले; चंद्रकांत खैरे
- “बंद पडलेल्या कारखान्याला धुऊन खाण्याचे काही लोकांचे काम”; शरद पवारांचा रोख नेमका कुणाकडे ?