मुंबई : राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या विधानभवनात सुरू असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळत आहे. यातच राज्यपालाच्या अभिभाषणावर विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघातून प्रथमच निवडणुन आलेले सत्यजीत तांबे यांनी पहिल्याच भाषणात ७५ हजार नोकर भरतीचा मुद्दा उपस्थित करत राज्य सरकारवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी सभागृहात वेगवेगळ्या मागण्या देखील केल्या.
हेही वाचा..पोलीस भरतीचा तो मुद्दा अजित पवारांनी सभागृहात मांडला, राज्य सरकारकडे केली ‘ही’ मागणी
राज्यपालाच्या अभिभाषणात ७५ हजार नोकर भरतीचा उल्लेख करण्यात आला आहे. परंतु ही भरती कधी होणार, कशी होणार ? याचा उल्लेख कुठेच करण्यात आला नाही. अनेकदा राज्य सराकारकडून अशा भरतीची घोषणा करण्यात येते. मात्र राज्यातील युवाकांना वारंवार रस्त्यावर उतरावं लागलं. एमपीएसच्या विद्यार्थ्यांना तर प्रत्येक वर्षी उतरावं लागतं. यामध्ये अनेक तरूण परिक्षेत पास होऊनही त्यांना अजून नियुक्ती देण्यात आलेली नाही. अशी नाराजी सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केली.
हेही वाचा..“छी..छी.. त्यावर कोण बोलणार?” नितेश राणेंच्या आरोपांवर आदित्य ठाकरेंची खोचक प्रतिक्रिया
परवा विधानसभेच्या पायऱ्यावर उच्च न्यायालयातील परिक्षेतील चौदाशे विद्यार्थ्यांचं शिष्ठामंडळ भेटलं. या परिक्षेत ते पास झालेत. परंतु त्यांना अद्याप नियुक्त्या देऊ शकलो नाही. यातच त्यांनी महाराष्ट्र शासनाची उच्च न्यायालयाशी संवाद साधावा. अन् आम्हाला नियुक्त्या द्याव्यात. जलसंपदा विभागामध्येही असाच प्रकार सुरू आहे. तसेच शिक्षक भरतीमध्ये २ लाख रिक्त जागा असतांना ७५ हजार भरतीनी किती युवकांना लाभ मिळेल असा सवालही त्यांनी केला.
75000 सरकारी भरतीची घोषणा होत असतांनाच प्रश्न निर्माण होतो की, ही भरती कधी होणार? कशी होणार? काही कालबद्ध कार्यक्रम सरकारकडे आहे का?
ज्या युवक-युवतींनी परीक्षा दिल्या, पास झाले, पण अजूनही नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहे, याबाबत काय कार्यवाही करणार?
असे अनेक प्रश्न निरुत्तरीत आहेत. pic.twitter.com/GTgztyYcjq— Satyajeet Tambe (@satyajeettambe) March 3, 2023
Read also
- हेही वाचा.“संजय राऊत अन् आदित्य ठाकरेंची सुरक्षा काढून घ्या,” माजी खासदाराची फडणवीसांकडे मागणी
- हेही वाचा..““रोज उठा आदित्यांना शिव्या द्या, अन् प्रसिद्धी मिळवा, मनसेचा हा नवा धंदा,” आदित्य ठाकरेंची बोचरी टिका
- हेही वाचा..“रोग हाल्याला, इंजेक्शन पखालीला,” एसटी कर्मचाऱ्याला निलंबित केल्यानंतर अजित पवारांचा संताप
- हेही वाचा..‘शिट्टी ‘ने घड्याळाचे काटे बंद केले, पण राहुल कलाटे डिपॉझिट वाचू शकले नाहीत, वाचा सविस्तर
- हेही वाचा..“माणसं नसतांना, फेसबुक लाईव्ह असतांना, चहापाणी कसा झाला?” अजित पवारांना उत्तर शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला