नागपूर : देशात नरेंद्र मोदी आणि भाजपची सत्ता येऊन आज ७ वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर आजचा दिवस काँग्रेसकडून ‘काळा दिवस’ म्हणून साजरा केला जात असून, मोदी सरकारच्या कारभाराविरोधात राज्यभर काँग्रेसची निदर्शने सुरु आहेत. तसेच, पंतप्रधान मोदींनी नैतिक जाबाबदारी स्वीकारून राजीनामा दयावा, अशी मागणी देखील काँग्रेसकडून केली जात आहे.
यातच आज नागपूर शहरातल्या एका पेट्रोल पंपावर, पेट्रोल दरवाढीविरोधात जगावेगळे आणि आगळेवेगळे आंदोलन नागपूर शहर युवक काँग्रेसकडून करण्यात आले. गाडीत पेट्रोल भरायला आलेला एक युवक, पेट्रोलचे दर शंभरी पार गेलेला बघून, हृदयविकाराचा झटका येऊन खाली कोसळतो आणि त्याला लगेचच कृत्रिम ऑक्सिजनवर ठेवण्यात येते, अशा तर्हेचे आंदोलन करून, नागपूर शहर युवक काँग्रेसकडून पेट्रोल दरवाढीचा प्रतीकात्मक निषेध करण्यात आला.
दरम्यान, हे आंदोलन लगेचच आकर्षणाचा विषय बनल्याने इथे गर्दी वाढू लागली आणि पोलिसांना घटनास्थळी बोलावण्यात आले. त्यामुळे आंदोलनकर्त्यांना हे आंदोलन आवरते घ्यावे लागले. यावेळी पोलिसंनी आंदोलनकर्त्यांनी सोबत आणलेले पंतप्रधानांचे मोठे फ्लेक्स देखील जप्त केले. तेव्हा आंदोलनकर्त्यांकडून, ‘ते पंतप्रधान आहेत, त्यांना का जेलमध्ये कैद करत आहात, ते नेहमीच बरोबर असतात,” अशा प्रकारचा आरडाओरडा करण्यात आला.
यावेळी एका आंदोलनकर्त्याने पोलिसांना विनंती केली, ‘प्रशासनाला शहरातल्या प्रत्येक पेट्रोल पंपावर एक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि व्हेंटिलेटर ठेवायला सांगा, पेट्रोलचे दर बघून आता पप्रत्येक नागरिकाला अशीच घेरी येणार आहे. दरम्यान, देशात सर्वत्र पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या दरात प्रचंड वाढ झाली असून दिवसेंदिवस यात मोठी वाढ होत आहे. इंधनाच्या वाढत्या किमतीवरुन देशात सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
Read Also :
- आज रात्री ८:३० वा. मुख्यमंत्र्यांचा जनसंवाद; लॉकडाऊनबाबत आज निर्णय
- “नशा दौलत का ऐसा भी क्या के तुझे कुछ भी याद नहीं…”, रुपाली चाकणकरांचा फडणवीसांना टोला
- ‘…तर बाळासाहेब ठाकरे वरून तुमच्या थोबाडीत मारतील!’
- मोदी सरकारच्या कारभाराविरोधात राज्यभर काँग्रेसची निदर्शने, केली मोदींच्या राजीनाम्याची मागणी
- ‘औरंगजेबाला स्वप्नात शिवाजी महाराज दिसायचे, चंद्रकांतदादांना अजित पवार दिसतात’