मुंबई : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री देखील उपस्थित होते. याचाच एक फोटो राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट केला आहे. ज्यामध्ये एकनाथ शिंदे हे अमित शहा यांच्यापासून दुर आहेत, तर कर्नाटकचे मुख्यमंत्री अमित शहांचा फुल देऊन स्वागत करीत आहेत. त्यावर त्यांनी खोचक टिप्पणी देखील केली आहे.
“नकळत काही चुकीचं बोललं असेल तर..”; सुषमा अंधारेंनी मागितली हात जोडून माफी
अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये असं म्हटलं आहे की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतच कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि यांच्यापासून दुर असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री. हे चित्र पाहून कर्नाटक पुढे महाराष्ट्र लाचार आहे. असे चित्र उभे करण्याचा हा भाजपचा डाव आज उघड्या डोळ्यांनी महाराष्ट्र पाहतोय. असं म्हणत अमोल मिटकरी यांनी राज्य सरकारवर कडाडून टिका केली.
“त्याची किंमत त्यावेळच्या राज्यकर्त्यांना चुकवावी लागली”; अजित पवारांचा राज्य सरकारवर संताप
मध्यंतरी राज्याच्या बाजूने भूमिका घेतल्याची प्रकरणे समोर आली आहे. त्यामुळे केंद्राने कोणाचीही बाजू न घेता, न्यायाची बाजू घ्यावी, ही आमची भूमिका आम्ही मांडली आहे. असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्रातील दोन मंत्री कर्नाटक जाणार होते त्यावेळी कर्नाटकने मनाई केल्याचा मुद्दा देखील फडणवीस यांनी अमित शहा यांच्यापुढे मांडला. या स्थितीचा फायदा घेऊन गोंधळ होण्याची शक्यता असल्याने इनपुट त्या सरकारकडे होते आणि त्यामुळे त्यांनी तसे पत्र पाठविले. कर्नाटक सरकार आता स्वत: महाराष्ट्रातील मंत्र्यांना निमंत्रित करणार असल्याचंही फडणवीस म्हणाले.
“तुषार भोसले आणि हा कंपू गॅंग म्हणत सुषमा अंधारेंचा जोरदार हल्ला”
दरम्यान, त्याआधी या बैठकीतून अमित शहा यांनी महत्वाचे मुद्दे मांडले आहेत. दोन्ही राज्यांचे प्रत्येकी 3 असे 6 मंत्री यांची एक समिती स्थापन केली जाणार आहे. या समितीवर सीमावादावरील सर्व मुद्यांची माहिती गोळा करण्याची जबाबदारी असेल. तसेच सुप्रीम कोर्टाचा निकाल येत नाही, तोवर कोणतेही राज्य वाद उत्पन्न होतील, अशी विधाने करणार नाहीत. कायदा-सुव्यवस्था चांगली राहिल. याची काळजी दोन्ही राज्यांकडून घेतली जाईल. बनावट ट्विटर खात्यांच्या माध्यामांतून काही खोटी माहिती प्रसारीत करण्याच्या घटना निदर्शनास आल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई केली जाईल. असंही अमित शहा यांनी म्हटलं आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजी यांच्यासोबत कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि यांच्यापासून दूर असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री. हे चित्र पाहून कर्नाटक पुढे महाराष्ट्र लाचार आहे असे चित्र उभे करण्याचा हा भाजपाचा डाव आज उघड्या डोळ्यांनी महाराष्ट्र पाहतोय. pic.twitter.com/Vkb1jv8Xjs
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) December 14, 2022
Read also
- “सुषमाताई, बाळासाहेबांची आता नाक घासून माफी कधी मागणार”; मनसेची आक्रमक भूमिका
- महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर अखेर गृहमंत्र्यांनी तोडगा काढला, म्हणाले…;
- “जिकडे सत्ता तिकडे पुढेच बच्चू कडू चिपळ्या वाजवयाला पुढे असतात”; राऊतांचं बच्चू कडूंना प्रत्युत्तर
- “निव्वळ फेसबुकवर पोकळ गप्पा मारून चालत नाही, त्यासाठी..;” बच्चू कडूंचा उद्धव ठाकरेेंना टोला
- शाईफेक प्रकरणी अटकेत असलेल्या तिघांनाही जामीन मंजूर.. हार घालत समर्थकांचा मोठा जल्लोष