पुणे : एरव्ही राज्यातील कोणत्याही राजकीय पक्ष, नेत्याची माफी मागत नाही. चुकून माकून आमच्या भागवत धर्माच्या संतपंरपरेला वाटत असेल तर मला हात जोडून क्षमा मागण्यासाठी कोणतीही संकोच वाटणार नाही. असं म्हणत सोशल मीडियावर व्हायरल झालेले सर्व व्हिडीओ 2009 च्या अगोदर असून ते माझ्या विरोधात षडयंत्र रचलं जात आहे. अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद..! “फडणवीसांनी पहिल्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं कान उपटले पाहिजे”
महाराष्ट्राने अंधश्रद्धा निर्मुलन कायदा केला आहे. मी कुणाच्या श्रद्धेच्या आड नाही. माझी अत्यंयात्रा काढली गेली. खऱ्या वारकरी संप्रदायात अशी अंत्ययात्रा नसते. अंत्ययात्रेत भगवा फेटा घालून कुणी बसत नाही. भगवा रंग भागवतं धर्माची पंरपरा आहे. त्याचा तो अवमान आहे. हे जे लोक भुंकतायेत त्यावर जास्त बोलू नये. अत्यंयात्रा ही भाजपची स्टंटबाजी आहे. अल्पवयीन मुलांचा त्यात गैरवापर केला आहे. वारकऱ्यांनी राजकारणात घुसू नये. असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
“कितीही काहीही झालं तरी ठाकरे गटासोबतच..!” राजन साळवींना एसीबीची नोटीस, चौकशी होणार
त्याचबरोबर व्हायरल झालेल्या व्हिडीओबाबत स्पष्टीकरण देतांना म्हणाल्या की, 14 सेकंदाच्या व्हिडीओ फिरवला गेला. पण माझं पुर्ण वाक्स असं होतं की, दादाहो, तुम्ही रेड्यामुखी वेद गायले मग आमचे गोरगरीब माणसं ज्ञानापासून वंचित राहावे असं कुठल्या धर्माला वाटेल. धर्म आणि सामान्य माणसांतील एजेंटांनी हे षडयंत्र केलंय का की गोरगरिबांना शिक्षण मिळू नये. दुसरा व्हिडीओ आहे तोही अर्धवट आलाय. ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली आणि माऊली म्हणवली. माझी आई ही माझ्यासाठी विश्ववंदनीय माऊली आहे असं मी बोलले असल्याचंही अंधारे यांनी म्हटलं आहे.
70 हजार कोटींच्या 13 प्रकल्पांना मंजूरी..! राज्यात शिंदे-फडणवीसांची गाडी जोरात, आघाडी कोमात
दरम्यान, शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा वारकरी आणि धर्माबाबत एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे. यावरून आता वारकऱ्यांनी सुषमा अंधारे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच वारकऱ्यांनी काल सुषमा अंधारे यांची जीवंत अत्यंयात्रा काढून अनोखे आंदोलन केलं. तसेच उद्धव ठाकरे यांनी सुषमा अंधारे यांना पक्षातून काढून टाकावं, अशी मागणी देखील वारकऱ्यांनी केली आहे.
Read also
- “त्याची किंमत त्यावेळच्या राज्यकर्त्यांना चुकवावी लागली”; अजित पवारांचा राज्य सरकारवर संताप
- “तुषार भोसले आणि हा कंपू गॅंग म्हणत सुषमा अंधारेंचा जोरदार हल्ला”
- उद्धव साहेब म्हणजे अढळ निष्ठा अन् विश्वासाचं प्रतीक..! राष्ट्रवादीचा माजी आमदार अन् भाजपचे कार्यकर्ते सेनेत दाखल
- “नितेश राणेला सत्तेचा माज चढलाय, त्यांच्यावर कारवाई होईल का?” राष्ट्रवादीचा मुख्यमंत्र्यांना सवाल
- पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची ‘ॲलर्जी’, शहरातील फ्लेक्स, कार्यक्रमांच्या होर्डिंग, जाहिरातीतून गायब