औरंगाबाद : उद्धव साहेबांवर अढळ निष्ठा आणि विश्वासाचं प्रतीक म्हणत औरंगाबाद येथील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेस, भाजपच्या राजकारणी नेत्यांचा समावेश आहे. आज मुंबई येथे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित पक्षप्रवेश करण्यात आला.
शिंदे-फडणवीसांचा मास्टर फ्लॅन..! तब्बल 30 वरिष्ठ पोलील अधिकाऱ्यांच्या एका रात्रीत बदल्या
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंडाळी केल्यानंतरही उद्धव ठाकरे यांची अनेकांनी साथ दिली. आज राष्ट्रवादी काॅंग्रेसचे वैजापुर मतदारसंघातील माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, तालुका पंचायत समितीचे अध्यक्ष, अॅड प्रतापराव पाटील निंबाळकर, प्रतापराव पाटील धोर्डे, सभापती कृ. उ.बा. स. यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
शिंदे-फडणवीस सरकार उद्या मंत्र्यांना घेऊन दिल्ली जाण्याची शक्यता..!
तसेच भाजपचे पैठणचे जिल्हा उपाध्यक्ष बद्रीनाथ भुमरे पाटील, डॉ. पांडुरंग राठोड, जिल्हा उपाध्यक्ष यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज भाजपला धक्का देत शिवबंधन हाती घेतले. त्याचबरोबर गंगापुर तालुक्यातील माजी सरपंच प्रदीप निरफळ यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी विधान सभेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सुभाष देसाई उपस्थित होते.
फडणवीसांची जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू..! मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे-फडणवीसांचे मोठे निर्णय
दरम्यान, एका बाजूला अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, उद्धव ठाकरे यांची साथ सोडत आहेत. तर दुसरीकडे आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन अनेक आजी, माजी आमदार, खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे पुढील निवडणुकांमध्ये कोणत्या राजकीय घडामोडी घडणार त्याकडे लक्ष्य लागून राहिलं आहे.
संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख श्री.उद्धवसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. उद्धवसाहेबांवरची अढळ निष्ठा आणि विश्वासाचं हे प्रतीक आहे! अशाच एकजुटीने महाराष्ट्र रक्षणासाठी शिवसेनेचे बाहू अजून बळकट होणार आहेत! pic.twitter.com/J2WkKordDq
— ShivSena – शिवसेना (@ShivSena) December 14, 2022
Read also
- “नितेश राणेला सत्तेचा माज चढलाय, त्यांच्यावर कारवाई होईल का?” राष्ट्रवादीचा मुख्यमंत्र्यांना सवाल
- पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची ‘ॲलर्जी’, शहरातील फ्लेक्स, कार्यक्रमांच्या होर्डिंग, जाहिरातीतून गायब
- महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद..! “फडणवीसांनी पहिल्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं कान उपटले पाहिजे”
- “कितीही काहीही झालं तरी ठाकरे गटासोबतच..!” राजन साळवींना एसीबीची नोटीस, चौकशी होणार
- 70 हजार कोटींच्या 13 प्रकल्पांना मंजूरी..! राज्यात शिंदे-फडणवीसांची गाडी जोरात, आघाडी कोमात