मुंबई : शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा वारकरी आणि धर्माबाबत एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे. यावरून आता वारकऱ्यांनी सुषमा अंधारे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच वारकऱ्यांनी काल सुषमा अंधारे यांची जीवंत अत्यंयात्रा काढून अनोखे आंदोलन केलं. तसेच उद्धव ठाकरे यांनी सुषमा अंधारे यांना पक्षातून काढून टाकावं, अशी मागणी देखील वारकऱ्यांनी केली आहे. यावर आता सुषमा अंधारे यांनी पत्रकार परीषद घेऊन आपली भूमिका घेतली आहे.
70 हजार कोटींच्या 13 प्रकल्पांना मंजूरी..! राज्यात शिंदे-फडणवीसांची गाडी जोरात, आघाडी कोमात
महाराष्ट्राने अंधश्रद्धा निर्मुलन कायदा केला आहे. मी कुणाच्या श्रद्धेच्या आड नाही. माझी अत्यंयात्रा काढली गेली. खऱ्या वारकरी संप्रदायात अशी अंत्ययात्रा नसते. अंत्ययात्रेत भगवा फेटा घालून कुणी बसत नाही. भगवा रंग भागवतं धर्माची पंरपरा आहे. त्याचा तो अवमान आहे. हे जे लोक भुंकतायेत त्यावर जास्त बोलू नये. अत्यंयात्रा ही भाजपची स्टंटबाजी आहे. अल्पवयीन मुलांचा त्यात गैरवापर केला आहे. वारकऱ्यांनी राजकारणात घुसू नये. असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
शिंदे-फडणवीसांचा मास्टर फ्लॅन..! तब्बल 30 वरिष्ठ पोलील अधिकाऱ्यांच्या एका रात्रीत बदल्या
तसेच गणेश शेटे तेच आहेत जे कोवीड काळात 2019 आणि 2020 ला मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला तेव्हा उद्धव ठाकरेंचा राजीनामा मागितला होता. तुषार भोसले आणि हा कंपू यांनी वारी बंद केल्याने रान पेटवले होते. जे कधीच वारीत पायी चालली नाही. कोवीड काळात लोकांचे आरोग्य न लक्षात केवळ राजकीय स्टंट केले. कारण भाजपकडून उघडलेली वारकरी आघाडी आहे.त्यातील हे लोक आहेत. देहू आळंदीत ज्यांनी मोदींना पाचारण केले, तिथे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलू दिलं नव्हतं. भाजपची ही आघाडी कधीच आम्हाला मतदान करत नव्हती. त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार असा आरोप देखील सुषमा अंधारे यांनी भाजपवर केला आहे.
शिंदे-फडणवीस सरकार उद्या मंत्र्यांना घेऊन दिल्ली जाण्याची शक्यता..!
त्याचबरोबर व्हायरल झालेल्या व्हिडीओबाबत स्पष्टीकरण देतांना म्हणाल्या की, 14 सेकंदाच्या व्हिडीओ फिरवला गेला. पण माझं पुर्ण वाक्स असं होतं की, दादाहो, तुम्ही रेड्यामुखी वेद गायले मग आमचे गोरगरीब माणसं ज्ञानापासून वंचित राहावे असं कुठल्या धर्माला वाटेल. धर्म आणि सामान्य माणसांतील एजेंटांनी हे षडयंत्र केलंय का की गोरगरिबांना शिक्षण मिळू नये. दुसरा व्हिडीओ आहे तोही अर्धवट आलाय. ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली आणि माऊली म्हणवली. माझी आई ही माझ्यासाठी विश्ववंदनीय माऊली आहे असं मी बोलले असल्याचंही अंधारे यांनी म्हटलं आहे.
Read also
- उद्धव साहेब म्हणजे अढळ निष्ठा अन् विश्वासाचं प्रतीक..! राष्ट्रवादीचा माजी आमदार अन् भाजपचे कार्यकर्ते सेनेत दाखल
- “नितेश राणेला सत्तेचा माज चढलाय, त्यांच्यावर कारवाई होईल का?” राष्ट्रवादीचा मुख्यमंत्र्यांना सवाल
- पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची ‘ॲलर्जी’, शहरातील फ्लेक्स, कार्यक्रमांच्या होर्डिंग, जाहिरातीतून गायब
- महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद..! “फडणवीसांनी पहिल्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं कान उपटले पाहिजे”
- “कितीही काहीही झालं तरी ठाकरे गटासोबतच..!” राजन साळवींना एसीबीची नोटीस, चौकशी होणार