पुणे : राष्ट्रवादी पक्ष फुट प्रकरणानंतर आता दोन्ही गटाचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतांना दिसत आहेत. सुरूवातीला आरोपांची धार कमी होती, परंतु आता ती चांगलीच वाढली आहे. यातच राष्ट्रवादी पक्षनाव आणि चिन्हांबाबत निवडणुक आयोगात देखील लढाई सुरू आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर एकत्र येण्याची शक्यता आहे. तसा कार्यक्रम देखील जाहीर करण्यात आला आहे.
हेही वाचा…अजित पवार गटाच्या आमदारांना मिळणार मोठं गिप्ट, अधिवेशन संपताच होणार मंत्रिमंडळाचा विस्तार
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे शंभरावे ऐतिहासिक नाट्य संमेलन विभागवार होणार असले तरी मुख्य उद्घाटन सोहळा पिंपरी-चिंचवड शहरात होत आहे. त्यानिमित्त ६ जानेवारी ते ७ जानेवारीला शहरातील नाट्यगृहांमध्ये विविध कार्यक्रमांची रेलचेल असून ६४ नाट्यकलांचा सहभाग असल्याची माहिती परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी दिली आहे.
हेही वाचा…रायगड लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत संघर्ष, कुणाला मिळणार लोकसभेची जागा ?
या कार्यक्रमासाठी संमेलनाच्या अध्यक्षपदी चित्रपट निर्माते डॉ.जब्बार पटेल, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वागताध्यक्ष तर उपमुख्यमंत्री अजित पवार स्वागत समिती अध्यक्ष आणि प्रमुख निमंत्रक म्हणून उद्योगमंत्री उदय सामंत असणार आहे. त्यामुळे पक्ष फुटीनंतर पिंपरी-चिंचवडच्या बालेकिल्ल्यात शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकाच व्यासपीठावर येणार आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“नुसतं “भाजपच्या आक्रस्ताळ्या बायका” म्हटलं, अन्.., ट्विटरवर चित्रा वाघ आणि सुषमा अंधारे एकमेकांत भिडल्या
हेही वाचा…“देवेंद्र भाऊ सरडा सुद्धा बघून आत्महत्या करेल हो..!” संजय राठोड, नवाब मलिक प्रकरणावरून सुषमा अंधारेंचा टोला
हेही वाचा…“विरोधकांच्या घोषणानंतर अखेर कुंभकर्ण सरकार जागे झाले”, नेमकं काय घडलं ?
हेही वाचा…नवाब मलिक राष्ट्रवादीच्या ‘या’ गटात सहभागी? नवाब मलिक सभागृहात बसल्यानंतर मोठा गोंधळ
हेही वाचा…“SIT चौकशी होणार असल्याने आदूने प्रवासाची “दिशा” बदलून थेट दुबई गाठलीय”, शिंदे गटाने आदित्य ठाकरेंना डिवचलं