पुणे : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला वादळी सुरूवात झाली आहे. वैद्यकीय जामीनावर बाहेर असलेले राष्ट्रवादीचे माजी मंत्री नवाब मलिक सभागृहात सत्ताधाऱ्यांच्या बाजूने बसल्यानंतर मोठा गोंधळ निर्माण झाला. एकावेळी देशद्रोहींच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांनी उत्तर द्यावे, अशी मागणी अंबादास दानवेंनी केली. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी तुमच्या सरकारच्या काळात त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा का घेतला नाही ? असा सवाल केला. त्यामुळे सभागृहात मोठा गोंधळ निर्माण झाला. यातच आता देवेंद्र भाऊ सरडासुद्धा आत्महत्या करेल हो, असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार घणाघात केला.
हेही वाचा…“रेटून खोटे बोलण्यात फडणवीस साहेबांचा हात कुणीच धरू शकत नाही”
सभागृहात आज देवेंद्र फडणवीसांनी नवाब मलिकांचा राजीनामा तेव्हाच का घेतला नाही ? असा अत्यंत सादसुदपणाने प्रश्न विचारला. त्यावर पुजा चव्हाणांवर बलात्कार करून हत्या करण्याचा प्रयत्न केला. याचा आरोप मंत्री संजय राठोड यांच्यावर तुम्हीच केला होता. त्यानंतर तुमच्याच पक्षाच्या आक्रसताळ्या बायकांना पुढे करत तुम्ही संजय राठोड यांचा राजीनामा घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर माझ्या पक्षानेही तो राजीनामा घेतला होता. परंतु त्याच संजय राठोड यांना तुम्हीच तुमच्या पंगतीला बरोबरीने बसूनही घेतले. तेच तुम्ही नवाब मलिकांच्या बाबतीत करत आहात. तुम्हाला कसं जमतंय? देवेंद्र भाऊ सरडेसुद्धा लाजून आत्महत्या करतील असा खोचक टोलाही सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
हेही वाचा…“जितेंद्र आव्हाड हे राजकारणातील राखी सावंत”, अजित पवार गटाच्या ‘या’ नेत्याने आव्हाडांना डिवचलं
दरम्यान, सुषमा अंधारे यांच्या टिकेनंतर आता भाजपकडून काय प्रतिक्रिया येणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्याआधी सभागृहात देशद्रोहींच्या मांडीला मांडी लावून बसणार नसल्याचे सत्ताधारी म्हणाले होते. ते आता त्यांनी स्पष्ट करावे. असं अंबादास दानवेंनी म्हटलं. त्यावर आम्ही कुणाच्याही मांडीला मांडी लावून बसलो नसल्याचा पलटवार देवेंद्र फडणवीसांनी केला. यामुळे सभागृहात मोठा गोंधळ बघायला मिळला. तर शोक प्रस्तावानंतर विधिमंडळाचं कामकाज उद्या अकरापर्यंत स्थगित करण्यात आलं.
READ ALSO :
हेही वाचा…“विरोधकांच्या घोषणानंतर अखेर कुंभकर्ण सरकार जागे झाले”, नेमकं काय घडलं ?
हेही वाचा…नवाब मलिक राष्ट्रवादीच्या ‘या’ गटात सहभागी? नवाब मलिक सभागृहात बसल्यानंतर मोठा गोंधळ
हेही वाचा…“SIT चौकशी होणार असल्याने आदूने प्रवासाची “दिशा” बदलून थेट दुबई गाठलीय”, शिंदे गटाने आदित्य ठाकरेंना डिवचलं
हेही वाचा…अजित पवार गटाच्या आमदारांना मिळणार मोठं गिप्ट, अधिवेशन संपताच होणार मंत्रिमंडळाचा विस्तार
हेही वाचा…रायगड लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत संघर्ष, कुणाला मिळणार लोकसभेची जागा ?