मुंबई : राष्ट्रवादी पक्ष फुट प्रकरणानंतर आता दोन्ही गटात जोरदार टिका टिप्पणी सुरू झाली आहे. कर्जत येथील शिबिरात अजित पवारांनी जितेंद्र आव्हाडांच्या ढेरीबद्दल वक्तव्य केलं होतं. त्यावर जितेंद्र आव्हाडांनी प्रत्युत्तर दिलं आहे. यानंतर आता अजित पवार गटाचे नेते सुरज चव्हाण यांनी जितेंद्र आव्हाडांवर पलटवार करत त्यांचा उल्लेख राखी सावंत असा केला आहे. त्यामुळे आता हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…“उठले की खुपसले नात्यात नाक, हेच काम उरले का राजकारणात ?” रूपाली पाटलांचा सवाल
अजित पवारांच्या टिकेनंतर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं. त्यात आव्हाड म्हणाले की, दादा त्या दिवशी पत्रकार परिषदेत तुम्ही माझ्या वाढलेल्या पोटाचा उल्लेख केला तेव्हा मला वाटले की तुम्ही व्यायाम करुन 6 pack abs केले असतील पण हा पर्वाचा फोटो तुमची ढेरी दाखवतो.. haha असं आव्हाडांनी म्हटलंय. त्यावर चुकलं माझं माफ करा दादा म्हणायची वेळ तुमच्यावर लवकरच येणार आहे हे लक्षात ठेवा. असा इशारा सुरज चव्हाण यांनी दिला. त्यानंतर जितेंद्र आव्हाड हे राजकारणातील राखी सावंत आहेत, ते प्रसिद्धी मिळवण्यासाठी दादांवर वक्तव्य करत असतात अशी टीकाही राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी केली.
हेही वाचा…“दादर स्थानकाचं नामांतर ‘चैत्यभूमी’ करावी ही कोट्यवधी भीम अनुयायांची मागणी ;”
राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला आज नागपुरात वादळी सुरूवात झाली आहे. अधिवेशनाला सुरूवात होण्याच्या आधी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. फक्त दहा दिवस चालणाऱ्या या अधिवेशात सत्ताधारी आणि विरोधक चांगलेच आक्रमक होण्याची शक्यता आहे.
चुकलं माझं माफ करा दादा म्हणायची वेळ तुमच्यावर लवकरच येणार आहे हे लक्षात ठेवा. https://t.co/IVZfKQKhWB
— Suraj Chavan (सूरज चव्हाण) (@surajvchavan) December 6, 2023
READ ALSO :
हेही वाचा…अधिवेशनाच्या आधीच सरकार विरोधकांची धार कमी करणार ? आदित्य ठाकरेंची ‘या’ प्रकरणात चौकशी होणार
हेही वाचा…“त्यामुळेच चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची भूमिका आघाडी सरकारने घेतली”, विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
हेही वाचा…“अजित “पर्व” या शब्दाने तुमच्या व्याकरणाची वाट लावली”,अजित दादाच्या आमदाराने आव्हाडांना डिवचलं
हेही वाचा…“याचा विसर आपल्याला कदाचित पडायला लागलाय”, राज ठाकरेंनी ट्विट केलं तीन फोटो
हेही वाचा…केंद्रीय मंत्र्यांसह भाजपच्या ‘या’ १० खासदारांनी दिला राजीनामा, कारण आलं समोर