पुणे : राष्ट्रवादी पक्ष फुट प्रकरणानंतर सुरूवातीला अजित पवार गटाने शरद पवारांबाबत सौम्य भूमिका घेतली होती. मात्र राजकीय वातावरणात बदल झाल्यानंतर अजित पवार गट आक्रमक होतांना दिसत आहे. शरद पवार गटाकडून टिका केल्यानंतर लगेच त्याला अजित पवार गटाकडून प्रत्युत्तर दिलं जात आहे. यावरूनच आता अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली पाटील यांनी यावर भाष्य केलंय.
हेही वाचा…हिवाळी अधिवेशनापुर्वी विरोधकांची जोरदार बॅनरबाजी, हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार ? पाहा व्हिडीओ
बापाची चप्पल पोराच्या पायात आली म्हणजे तो बापाचा बाप होत नाहीच, पण बापाची चपल पायात आल्या म्हणजे लेक बापमाणूस पात्रतेचा झाला याचा आनंद बापाला द्विगुणीत नक्कीच असतो. बाप, लेकात, भाऊ, बहिणीत एवढेही नाक खुपसू नये की दत्तक पोराने, उठले की खुपसले नात्यात नाक, हेच काम उरले का राजकारणात ? असा खोचक सवाल देखील रूपाली पाटलांनी केलाय.
हेही वाचा…“विश्वासघाती उद्धव ठाकरे सेना इतिहास जमा होणार”, किरीट सोमय्यांनी ठाकरेंना डिवचलं
दरम्यान, आरक्षणावर देखील त्यांनी भाष्य केलंय. आरक्षण हे सविधांनाने मिळणारच, राज्य कायद्यानेच चालणार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनीही ओबीसीला धक्का न लावता मराठा आरक्षण देऊ सांगितले, तरीही धमकी देणे, समाजात चिथावणी भाष्य करणे, समाजात अशांतता निर्माण करत असतील तर गृहखाते , पोलिसांनी कायदेशीर कडक करावी करावी. फक्त कायद्याचे बोला. असंही त्या म्हणाल्या.
बापाची चप्पल पोराच्या पायात आली म्हणजे तो बापाचा बाप होत नाहीच,पण बापाची चपल पायात आल्या म्हणजे लेक बापमाणुस पात्रतेचा झाला याचा आनंद बापाला द्विगुणीत नक्कीच असतो.
बाप, लेकात,भाऊ,बहिणीत एवढेही नाक खुपसू नये दत्तक पोराने.
उठले की खुपसले नात्यात नाक, हेच काम उरले का राजकारणात.— Rupali patil thombare (@Rupalispeak) December 6, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“दादर स्थानकाचं नामांतर ‘चैत्यभूमी’ करावी ही कोट्यवधी भीम अनुयायांची मागणी ;”
हेही वाचा…हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार ? विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
हेही वाचा…“पक्ष आणि कार्यालय आमचेच आहे”,अधिवेशनापुर्वी राष्ट्रवादीचे दोन्ही गट आमनेसामने
हेही वाचा…“ऐनवेळी भाजपने दगाफटका केल्यास..,” शिंदे गटाने नेमले ३९ लोकसभा मतदारसंघासाठी निरीक्षक
हेही वाचा…मोठी बातमी…! ललित पाटील पलायन प्रकरणी सहा जणांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल