नाशिक : राज्यातील महायुतीत लोकसभेच्या जागावाटपावरून रस्सीखेच सुरू असतानाच, शिवसेना शिंदे गटाने राज्यातील३९ लोकसभा मतदारसंघांसाठी निरीक्षक जाहीर केले आहेत. हे निरीक्षक जाहीर करून लोकसभेच्या अधिक जागा मिळवण्यासाठी शिंदे गटाने भाजपवर दबाव वाढवला आहे. यासोबतच विभागीय संघटनेच्या जबाबदाऱ्यांचेही वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे भाजपपाठोपाठ शिंदे गटानेही ताकद लावण्यास सुरवात केली आहे.
हेही वाचा…राजस्थान हादरल..! राजपूत करणी सेनेच्या अध्यक्षाची गोळी घालून ह’ त्या , व्हिडीओ व्हायरल
लोकसभेच्या सेमिफायन समजल्या जाणाऱ्या देशातील पाच पैकी तीन राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला आहे. त्यामुळे भाजपचं बळ वाढले असून भाजपने लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केलं असून राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघावर भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. यातच शिंदे गट आणि अजित पवार गटाला कमी जागा देण्यासाठी भाजपकडून दबाव वाढविण्यास सुरूवात झाली आहे. तोच दबाव शिंदे गटाकडून हटवला जात आहे.
हेही वाचा…आता राष्ट्रवादीच्या कार्यालयावरून दोन गटात वाद, अजित पवार गट म्हणतो की,..
भाजपने ऐनवेळी दगाफटका केल्यास तयारी असावी या उद्देशाने आता शिवसेना शिंदे गटाने राज्यातील ४८ पैकी ३९ निरीक्षक नियुक्त केले आहे. यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी जयंत साठे, दिंडोरीसाठी सुनील पाटील, धुळेसाठी प्रसाद ढोमसे, जळगावसाठी सुनील चौधरी, नंदूरबारसाठी राजेश पाटील यांची नियुक्ती केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मोठी बातमी…! ललित पाटील पलायन प्रकरणी सहा जणांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल
हेही वाचा…हिवाळी अधिवेशनापुर्वी विरोधकांची जोरदार बॅनरबाजी, हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार ? पाहा व्हिडीओ
हेही वाचा…“विश्वासघाती उद्धव ठाकरे सेना इतिहास जमा होणार”, किरीट सोमय्यांनी ठाकरेंना डिवचलं
हेही वाचा…“भुजबळांना लोळवलं नाही तर नाव बदलून ठेवणार”, जरांगे पाटलांचा भुजबळांना इशारा
हेही वाचा…उद्धव ठाकरे, पटोले आणि बावनकुळेंची एकाच ठिकाणी व्यवस्था, अधिवेशनासाठी जय्यत तयारी