नागपुर : राज्याच्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या ७ तारखेला म्हणजे उद्यापासून सुरू होत आहे. अधिवेशनासाठी नागपुरात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांच्या बंगल्याच्या दुरूस्ती करण्यात आली आहे. तर इतर विधानसभा आणि विधान परिषदेमधील आमदारांची व्यवस्था आमदार निवासामध्ये करण्यात आली आहे. यातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची व्यवस्था एकाच इमारतीमध्ये करण्यात आली आहे.
हेही वाचा…“हिवाळी अधिवेशनात शरद पवार गटाचे आमदार सरकारला घेरणार,” जयंत पाटलांनी दिल्या सूचना
नागपुरात अधिवेशनासाठी येणाऱ्या विधानसभा व विधान परिषद सदस्यांची येथील आमदार निवासात मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे. इमारत क्रमांक एकमध्ये उद्दव ठाकरे यांना क्रमांक २ ची खोली आरक्षित करण्यात आली आहे. तर बावनकुळेंना पहिल्या माळ्यावरील १२७ क्रमाकांची खोली, तर नाना पटोले यांना पहिल्या माळ्यावरील खोली क्रमांक १०९ तर जयंत पाटलांना पहिल्या माळ्यावरील खोली क्रमांक १०५ देण्यात आलीय. तर आदित्य ठाकरेंना खोली क्रमांक ४०६ देण्यात आलीय.
हेही वाचा…“मंत्रिपदासाठी आता फक्त देवाला कौल लावायचा बाकी राहिलाय”, शिंदेंचा ‘हा’ आमदार अजूनही मंत्रीपदासाठी आतूर
दरम्यान, नागपुर येथे होऊ घातलेल्या हिवाळी अधिवेशनासाठी अजित पवारांना विजय गड बंगला देण्यात आला आहे. या बंगल्याच्या दुरूस्तीचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मागच्या महिन्यातच सुरू केलं होतं. बंगल्यात दुरूस्ती तसेच रंगरंगोटी आणि नवे बांधकाम करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून १ कोटी खर्च करण्यात आले आहे. या बंगल्यात अजित पवारांचा बंगला दुरूस्तीनंतर फाईव्ह स्टार प्रमाणे सजला आहे. विजयगड बंगल्यावर लॉर्ड गार्डन, हॉल अशा सुविधा आहेत. त्या बंगल्या शेजारीच अजित पवारांच्या खाजगी स्वय सहाय्यकाचाही बंगला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…राजस्थान हादरल..! राजपूत करणी सेनेच्या अध्यक्षाची गोळी घालून ह’ त्या , व्हिडीओ व्हायरल
हेही वाचा…आता राष्ट्रवादीच्या कार्यालयावरून दोन गटात वाद, अजित पवार गट म्हणतो की,..
हेही वाचा…“आरोग्य मंत्रालय भ्रष्टाचाराचे कुरण झालंय,” संजय राऊतांनी पुराव्यासह शिंदेंना धाडलं पत्र
हेही वाचा…“मराठे मागास नाहीत, जरांगे पाटलांनी राजकीय पक्ष काढावा,” गुणरत्ने सदावर्तेंचा हल्लाबोल
हेही वाचा…“दादा तुम्ही व्यायाम करून सिक्स पॅक अब्ज तयार केले असतील, पण..,” आव्हाडांची अजितदादांवर खोचक टिप्पणी