नवी दिल्ली : राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने काॅंग्रेसवर दणदणीत विजय मिळवला. निवडणुकांचा जल्लोष संपता ना संपता राजस्थानमध्ये आता खुनांच्या घटनांमध्ये वाढ होतांना दिसत आहे. काल श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा…“मंत्रिपदासाठी आता फक्त देवाला कौल लावायचा बाकी राहिलाय”, शिंदेंचा ‘हा’ आमदार अजूनही मंत्रीपदासाठी आतूर
सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या खुनाचा काल व्हिडीओ समाजमाध्यमावर प्रंचड व्हायरल झाला. यात दोन हल्लेखोर तीन मारेकऱ्यांनी सुरूवातीला सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या घरी येऊन गप्पा मारल्या. त्यानंतर अचाकन तिघातील एक जण उठला अन् सुखदेव सिंह गोगामेडी यांच्यावर बंदूकीतून गोळीबार सुरू केला. त्यानंतर गोगामेडी यांचा सुरक्षा रक्षकावर देखील मारेकऱ्यांनी गोळीबार केला. याचा सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. प्रत्युत्तरादाखल गोगामेडी यांच्या सुरक्षा रक्षकाने केलेल्या गोळीबारात एक मारेकरी मारला गेला आहे.
हेही वाचा…“पंकजा मुंडे आणि माझ्यातील राजकीय संघर्ष संपला”, बीडमध्ये धनंजय मुंडेंचं मोठं विधान
दरम्यान, गोगामेडी यांच्यावर हल्ला केल्यानंतर पळून जाताना एका कारचालकाला रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर स्कुटीचालकावर गोळी झाडत त्याला जखमी केले आणि घटनास्थळावरून फरार झाले. पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. श्री राजपुत करणी सेनेचे अध्यक्ष लोकेंद्र सिंह कळवी यांच्यासोबतच्या मतभेदातून २०१५ मध्ये गोगामेडी यांनी श्री राष्ट्रीय करणी सेनेचे स्थापना केली होती. पद्मावत चित्रपटाविरोधात त्यांनी विरोध प्रदर्शन केले होते.
Sukhdev Singh Gogamedi (President of Shri Rashtriya Rajput karni Sena) shot dead in multiple rounds of firing inside his own house(Jaipur) on tuesday.
Attackers shot multiple times,last bullet hit his head.#KarniSena #rajasthan #सुखदेवसिंहगोगामेड़ी #LawrenceBishnoi pic.twitter.com/et2Dodx5nc— Raunak kumar (@_cruister_) December 5, 2023
READ ALSO :
हेही वाचा…आता राष्ट्रवादीच्या कार्यालयावरून दोन गटात वाद, अजित पवार गट म्हणतो की,..
हेही वाचा…“आरोग्य मंत्रालय भ्रष्टाचाराचे कुरण झालंय,” संजय राऊतांनी पुराव्यासह शिंदेंना धाडलं पत्र
हेही वाचा…“मराठे मागास नाहीत, जरांगे पाटलांनी राजकीय पक्ष काढावा,” गुणरत्ने सदावर्तेंचा हल्लाबोल
हेही वाचा…“दादा तुम्ही व्यायाम करून सिक्स पॅक अब्ज तयार केले असतील, पण..,” आव्हाडांची अजितदादांवर खोचक टिप्पणी
हेही वाचा…“हिवाळी अधिवेशनात शरद पवार गटाचे आमदार सरकारला घेरणार,” जयंत पाटलांनी दिल्या सूचना