मुंबई : मराठा आरक्षणावर आज कोर्टात महत्वाची सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीत मराठा आरक्षणावरील क्युरेटिव्ह पिटीशनवर सुनावणी होणार असून आज कोर्टाच्या सुनावणीकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे. याच पार्श्वभूमीवर वकिल गुणरत्ने सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटलांवर घणाघाती टिका केली आहे.
हेही वाचा…“मनोज जरांगे पाटलांना ‘या’ ठिकाणी दाखवले काळे झेंडे, वाद आणखी चिघळणार “?
मनोज जरांगे पाटलांनी राजकारण करावं, याची कुणालाही हरकत नाही. आता तर त्यांनी पक्षाची घोषणाही करून टाकावी, परंतु इतरांना कलंकित, लायकीचे नाहीत, बघून घेऊ, अशी भाषा महाराष्ट्रात चालु दिल्या नाही पाहिजेत. असं गुणरत्ने सदावर्ते यांनी म्हटलंय. क्युरेटिव्ह पिटीशनमधून मराठा समाजाला काही नव्याने काही मिळणार नाही. मराठा समाजाला मागास ठरवण्याच्या भानगडीत पडाल तर काहीच मिळणार नाही. यातच तुम्हाला डंके की चोट पर सांगतो की, राज्यशासनाला कुणबी प्रमाणपत्रामध्ये कायदा करता येणार नाही. असंही त्यांनी म्हटलंय.
हेही वाचा…राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेशात भाजप जिंकली की EVM वर शंका, किती रडारड करणार ? भाजपचं ठाकरेंना प्रत्युत्तर
दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात क्यरेटिव्ह पिटीशनवर सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या दालनात ही सुनावणी होत असून या सुनावणीत युक्तिवाद होणार आहे. फक्त ३ न्यायमूर्ती आणि सरन्यायाधीश उपस्थित राहणार असून दालनात आज केस पुढे चालवायची की नाही, याचा निर्णय होणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“दादा तुम्ही व्यायाम करून सिक्स पॅक अब्ज तयार केले असतील, पण..,” आव्हाडांची अजितदादांवर खोचक टिप्पणी
हेही वाचा…“हिवाळी अधिवेशनात शरद पवार गटाचे आमदार सरकारला घेरणार,” जयंत पाटलांनी दिल्या सूचना
हेही वाचा…“मंत्रिपदासाठी आता फक्त देवाला कौल लावायचा बाकी राहिलाय”, शिंदेंचा ‘हा’ आमदार अजूनही मंत्रीपदासाठी आतूर
हेही वाचा…“पंकजा मुंडे आणि माझ्यातील राजकीय संघर्ष संपला”, बीडमध्ये धनंजय मुंडेंचं मोठं विधान
हेही वाचा…“कराड आम्हाला अजूनही नगरसेवकच वाटतात”, भागवत कराडांचं आव्हान फेटाळत खैरेंचा लोकसभेवर दावा