छत्रपती संभाजीनगर : जशी जशी लोकसभेची निवडणुक जवळ येईल. तसा तसा राजकीय प्रचार वाढत जाईल. राज्यात प्रथमच पुढील निवडणुका महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशा होणार आहेत. त्याची आता जय्यत तयारी सुरू केली आहे. ठाकरे गटाकडूनही संघटनात्मक बांधणी आणि पक्ष बळकट करण्याची मोठी जबाबदारी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्याकडे सोपवली आहे. त्यामुळे याठिकाणी आता दिवसेंदिवस राजकारण तापत आहे.
हेही वाचा…तीन राज्यांत भाजपची एकहाती सत्ता, अजितदादा गटात उत्साह वाढला
छत्रपती संभाजीनगर मध्ये विद्यमान खासदार भागवत कराडांना भाजप पुन्हा उमेदवारी देण्याच्या तयारीत आहेत. त्यावरून कराड आम्हाला अजूनही नगरसेवकच वाटतात, असा टोला लगावत केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांचं कोणतंही आव्हान नसल्याचं खैरे यांनी त्यांच्या बोलण्यातून दाखवून दिलं आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना लोकसभेची निवडणुकीची जबाबदारी ठाकरे गटाने खैरे यांच्यावर सोपवली आहे. त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा…जरांगे पाटलांच्या सभेत चोरांचा सुळसुळाट, अडीच ते तीन लाखांवर मारला डल्ला, कार्यकर्त्यांनी दिला बेदम मार
दरम्यान, शिवसेनेत बंड झाल्यानंतर ठाकरे यांच्याबद्दल राज्यात सहानुभूतीचे वातावरण आहे. यातच आता चंद्रकांत खैरे यांचा गेल्या लोकसभा निवडणुकीत अवघ्या पाच हजार मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे पक्ष आणखी एक संधी देईल. या तयारीत खैरेंनी कामाला सुरूवात केली आहे. यातच कराड यांचा टिकाव शिवसेनेसमोर लागणार नाही. ही जागा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
READ ALSO :
हेही वाचा…“मनोज जरांगे पाटलांना ‘या’ ठिकाणी दाखवले काळे झेंडे, वाद आणखी चिघळणार “?
हेही वाचा…राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेशात भाजप जिंकली की EVM वर शंका, किती रडारड करणार ? भाजपचं ठाकरेंना प्रत्युत्तर
हेही वाचा…“चार राज्यांचा निवडणुका सोडा आता मुंबई पालिकेची निवडणूक घेऊन दाखवा”, उद्धव ठाकरेंचं आवाहन
हेही वाचा…आ’त्म’ह’त्या’ नाही, खूनी सरकार…! जितेंद्र आव्हाडांची राज्य सरकारवर जहरी टिका
हेही वाचा…पदवीधर निवडणुकांसाठी ठाकरेंची मोठी रणनिती, ‘या’ दोन मोठ्या नेत्याला संधी