वाशिम : राज्यात सध्या मराठा विरूद्ध ओबीसी आरक्षणचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. राज्य सरकारला मनोज जरांगे पाटलांनी २ जानेवारी पर्यंत मुदत दिली आहे. तर सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, या मागणी साठी ओबीसी समाज रस्त्यावर उतरला आहे. यातच वाशिम येथे मनोज जरांगे पाटलांना काळे झेंडे दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे हा वाद आणखी पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा…जरांगे पाटलांच्या सभेत चोरांचा सुळसुळाट, अडीच ते तीन लाखांवर मारला डल्ला, कार्यकर्त्यांनी दिला बेदम मार
मनोज जरांगे पाटलांच्या सभा सध्या संपुर्ण महाराष्ट्रात होत आहेत. यातच मनोज जरांगे पाटलांची वाशिम येथे सभा होत असताना त्याठिकाणी जातांना त्यांना वाशिम जिल्ह्यातील तामसा फाट्यावरील काठा इथे काळे झेंडे दाखवण्यात आले आहे. पोलिसांनी काळे झेंडे दाखवणाऱ्या ओबीसी कार्यकर्त्यांना रोखलं आहे.
हेही वाचा…अधिवेशनासाठी अजित पवारांचा ‘विजयगड’ बंगला सजला, दुरूस्तीसाठी तब्बल १ कोटीचा केला खर्च
दरम्यान, मराठा आरक्षणावरून मराठा समाजाने सुरूवातीपासून आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यातील मंत्री, आमदार खासदारांच्या ताफ्याला मराठा समाजाकडून काळे झेंडे दाखवण्यात येत आहे. परंतु यातच आता मनोज जरांगे पाटलांना काळे झेंडे दाखवण्यात आल्याने आता वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा…राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेशात भाजप जिंकली की EVM वर शंका, किती रडारड करणार ? भाजपचं ठाकरेंना प्रत्युत्तर
हेही वाचा…“चार राज्यांचा निवडणुका सोडा आता मुंबई पालिकेची निवडणूक घेऊन दाखवा”, उद्धव ठाकरेंचं आवाहन
हेही वाचा…आ’त्म’ह’त्या’ नाही, खूनी सरकार…! जितेंद्र आव्हाडांची राज्य सरकारवर जहरी टिका
हेही वाचा…पदवीधर निवडणुकांसाठी ठाकरेंची मोठी रणनिती, ‘या’ दोन मोठ्या नेत्याला संधी
हेही वाचा…तीन राज्यांत भाजपची एकहाती सत्ता, अजितदादा गटात उत्साह वाढला