जळगाव : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटलांच्या जाहीर सभा होत आहे. या जाहीर सभांसाठी लाखोंच्या संख्येने मराठा समाज गर्दी करीत आहेत. या गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांचा सुळसुळाट बघायला मिळत आहेत. जरांगेंचं भाषण सुरू असतानाच चोरटे चोरी करीत असल्याची घटना जळगावात घडली आहे. यातच एका चोराला मलकापुर एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
हेही वाचा…फक्त १२ वी पास, अंगावर ११ गुन्हे, तरीही ‘या’ नेत्याने मुख्यमंत्री आणि भावी मुख्यमंत्र्याला पाणी पाजलं, निवडणुकीत मिळवला दणदणीत विजय
जळगावात मनोज जरांगे पाटलांची सभा सुरू असताना एका अज्ञात व्यक्तीने स्वागतासाठी आलेल्या एका कार्यकर्त्यांच्या खिशात हात घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीला चांगलाच चोप दिला. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत कार्यकर्त्यांच्या तावडीतून सोवडलं आणि ताब्यात घेतलं.
हेही वाचा…पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सिंधुदुर्गात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण
मलकापुर एमआयडीसी पोलिसांनी चोराला ताब्यात घेतल्यानंतर त्याला पोलिस स्टेशनमध्ये आणण्यात आलं. त्यावेळी त्या चोराने एका दिवसातच जवळपास अडीच ते तीन लाख रूपये ताफ्यातून विविध ठिकाणी उडविल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे. यातच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी सोने आणि रोख रकमेशह लाखो रूपये किमंतीच्या ऐवजावरही डल्ला मारल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मनोज जरांगे पाटलांची सभा पार पडल्यानंतर पोलिसांमध्ये यासंदर्भात अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…अधिवेशनासाठी अजित पवारांचा ‘विजयगड’ बंगला सजला, दुरूस्तीसाठी तब्बल १ कोटीचा केला खर्च
हेही वाचा…“पुणे लोकसभेसाठी जोशींचं नाव चर्चेत, परंतु पक्षाने उमेदवारी दिली तर मीच लढवणार”, धंगेकरांचं मोठं विधान
हेही वाचा…अमरावतीत शरद पवार गटाचा आक्रोश मोर्चा, जयंत पाटील, अनिल देशमुख, पवार मोर्चात हजर राहणार
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश, दापोलीत राष्ट्रवादीला मोठा धक्का
हेही वाचा…ललित पाटील प्रकरणी कारवाईंच्या हालचाली वाढल्या, बड्या अधिकाऱ्याला अटक