अमरावती : राज्यात मागील काही दिवसापासून झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. राज्यातील विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान ग्रस्त भागांची पाहणी केली. तसेच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. परंतु अजूनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली नाही. यावरून आज शरद पवार गटाचा अमरावतीत अक्रोश मोर्चा निघणार आहे.
हेही वाचा…तेलंगणा निवडणुकीचा पुण्यात परिणाम, ‘या’ नेत्याचे लागले भावी खासदार म्हणून बॅनर
शेतकरी, कामगार, विद्यार्थी, युवक तसेच सध्याच्या ज्वलंत प्रश्नांवर शरद पवार गट आक्रमक झाला आहे. मोर्चात शेतकरी, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व शेकडो ट्रॅक्टर देखील सहभागी होणार आहे. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा असल्याने पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे.
हेही वाचा…“देवेंद्र फडणवीसांनी माणसं घडवली नाही तर पक्षातील माणसं संपवली”, कोणी केली टिका ?
सकाळी ११ वाजता अमरावतीच्या नेहरू मैदानापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघेल. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, आमदार रोहित पवार, महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे मोर्चात सहभागी होणार आहेत. यातच शरदच पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कष्टकरी शेतकऱ्यांचा आवाज अधिक बुलंद करण्यासाठी, अस्मानी संकटामुळं हतबल झालेल्या शेतकऱ्याला सामर्थ्य देण्यासाठी आज अमरावती येथे आयोजित आक्रोश मोर्चासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असं आवाहन जयंत पाटलांनी केले आहे.
आदरणीय खा. शरदचंद्र पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कष्टकरी शेतकऱ्यांचा आवाज अधिक बुलंद करण्यासाठी, अस्मानी संकटामुळं हतबल झालेल्या शेतकऱ्याला सामर्थ्य देण्यासाठी आज #अमरावती येथे आयोजित आक्रोश मोर्चासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. #शेतकरी_आक्रोश_मोर्चा @NCPspeaks…
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) December 5, 2023
READ ALSO :
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश, दापोलीत राष्ट्रवादीला मोठा धक्का
हेही वाचा…ललित पाटील प्रकरणी कारवाईंच्या हालचाली वाढल्या, बड्या अधिकाऱ्याला अटक
हेही वाचा…फक्त १२ वी पास, अंगावर ११ गुन्हे, तरीही ‘या’ नेत्याने मुख्यमंत्री आणि भावी मुख्यमंत्र्याला पाणी पाजलं, निवडणुकीत मिळवला दणदणीत विजय
हेही वाचा…पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सिंधुदुर्गात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण
हेही वाचा…हिवाळी अधिवेशन सुरू होण्याआधी ‘आप’ला मिळाली चांगली बातमी