पुणे : राजस्थान आणि छत्तीसगड राज्यातील सत्ता भाजपने काॅंग्रेसकडून खेचून आणली आहे. तर मध्यप्रदेशात सत्तापरिवर्तन न होता जनतेने पुन्हा भाजपला कौल दिला आहे. यामध्ये काॅंग्रेसला फक्त तेलंगणात सत्ता स्थापन करता आली आहे. यातच आता तेलंगणात महत्वाची जबाबदारी पार पाडल्यानंतर पुण्यात काॅंग्रेस नेत्याचे भावी खासदार म्हणून बॅनर लागले आहेत.
हेही वाचा…शिंदेंचा मोठा मंत्री अडचणीत येणार ? व्हिडीओ व्हायरल करण्याचा जरांगे पाटलांनी दिला इशारा
भाजपचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुण्यात पोटनिवडणुक झाली नाही. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीची आता जय्यत तयारी करण्यात येत आहे. अशातच तेलंगणात ७ मतदारसंघाची जबाबदारी पार पाडलेल्या मोहन जोशी यांचे भावी खासदार म्हणून बॅनर लागले आहेत. युवक काॅंग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी हे बॅनर पुण्याच्या मध्यवर्ती भागात लावले आहेत. त्यामुळे याची एकच चर्चा सध्या सुरू आहे.
हेही वाचा…निवडणुकांचा जल्लोष होत असतांना भाजपच्या दोन्ही गटात जोरदार राडा, 23 जणांवर गुन्हा दाखल
दरम्यान, पुणे लोकसभा निवडणुकीसाठी अनेकांची नावे चर्चेत आली आहेत. महाविकास आघाडीकडून पुणे लोकसभेची जागा काॅंग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून तसेच काॅंग्रेसकडून मोहन जोशी यांच्या नावाची चर्चा आहे. तर भाजपकडून गिरीश बापट यांची सुन स्वरदा बापट, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार जगदीश मुळीक, माजी राज्यसभा खासदार संजय काकडे यांच्या नावांची चर्चा सुरू आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“देवेंद्र फडणवीसांनी माणसं घडवली नाही तर पक्षातील माणसं संपवली”, कोणी केली टिका ?
हेही वाचा…“गॅरंटी बोले तो मोदी जी, पनौती बोले तो..,”चित्रा वाघ यांना राहुल गांधींवर निशाणा
हेही वाचा…“मुंबईची जलवाहिनी फुटली, लोकांचे मोठे हाल,” आदित्य ठाकरेंचे पालिकेला कडक सवाल
हेही वाचा…विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षाची सत्ता उलथावून लावली, उपमुख्यमंत्र्यांचा मोठा पराभव, मुख्यमंत्रीही पिछाडीवर
हेही वाचा…काका काॅंग्रेसचा तर पुतण्या भाजपचा..! रंगला मोठा डाव, म्हणाले की, “हाताच्या मदतीशिवाय कमळ कसे फुलणार”