पुणे : देशातील चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांपैकी भाजपने तीन राज्यात दणदणीत विजय मिळवला आहे. राजस्थान आणि छत्तीसगडमधली काॅंग्रेसची सत्ता खेचून आणण्यात भाजपला यश मिळालं आहे. तर मध्यप्रदेशातील सत्ता भाजपने राखली आहे. या निवडणुकांच्या प्रचारात काॅंग्रेसची गॅरंटी असा प्रचार करण्यात आला होता. यावरूनच आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी खासदार राहुल गांधी यांच्यावर टिकास्त्र सोडलंय.
हेही वाचा…विद्यमान अन् भावी मुख्यमंत्र्यांला घाम फोडणारा भाजपचा बाहुबली कोण ? राजकारणात एकच चर्चा
गॅरंटी बोले तो मोदी जी, पनौती बोले तो पप्पू जी ! असं म्हणत चित्रा वाघ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतूक केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा करिष्मा पुन्हा एकदा या निकालांनी सिद्ध झाला आहे. विरोधकांनी आकाश-पातळ एक केलं. पण मोदींच्या जादूपुढे सारेच चीतपट झाले आहेत. असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय.
हेही वाचा…राजस्थानमध्ये काॅंग्रेसला धोबीपछाड, कोण होणार मुख्यमंत्री ? भाजपच्या ‘या’ महिला नेत्या शर्यरीत
पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, मोदींच्या पाठीशी तिन्ही राज्यातील लाडक्या बहिणी ठामपणे उभ्या राहिलेल्या आपल्याला पहायला मिळाल्या. जानेवारीला भगवान श्रीराम मंदिरात विराजमान होणार आणि २०२४ च्या निवडणुकांनंतर मोदींच्या रूपानं पुन्हा रामराज्य येणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.
गॅरंटी बोले तो मोदी जी, पनौती बोले तो पप्पू जी !
मोदीजींच्या नेतृत्वाचा करिष्मा पुन्हा एकदा या निकालांनी सिद्ध केलाय. विरोधकांनी आकाश-पाताळ एक केलं; पण मोदीजींच्या जादूपुढे सारेच चीतपट झाले..
मोदी जींच्या पाठीशी तिन्ही राज्यातील लाडक्या बहीणी ठामपणे उभ्या राहीलेल्या आपल्याला… pic.twitter.com/FEv6A75O5w
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) December 3, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“मुंबईची जलवाहिनी फुटली, लोकांचे मोठे हाल,” आदित्य ठाकरेंचे पालिकेला कडक सवाल
हेही वाचा…विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षाची सत्ता उलथावून लावली, उपमुख्यमंत्र्यांचा मोठा पराभव, मुख्यमंत्रीही पिछाडीवर
हेही वाचा…काका काॅंग्रेसचा तर पुतण्या भाजपचा..! रंगला मोठा डाव, म्हणाले की, “हाताच्या मदतीशिवाय कमळ कसे फुलणार”
हेही वाचा…शिंदेंचा मोठा मंत्री अडचणीत येणार ? व्हिडीओ व्हायरल करण्याचा जरांगे पाटलांनी दिला इशारा
हेही वाचा…निवडणुकांचा जल्लोष होत असतांना भाजपच्या दोन्ही गटात जोरदार राडा, 23 जणांवर गुन्हा दाखल