लातूर : देशातील चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने काॅंग्रेसचा मोठा पराभव केला आहे. काॅंग्रेसच्या ताब्यात असलेल्या राजस्थान आणि छत्तीसगडमधील सत्ता खेचून आणली तर मध्यप्रदेशात पुन्हा कमळ फुलवलं आहे. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचं आभार मानले आहे. यावरून आता लातूरमध्ये काका पुतण्यांकडून जोरदार राजकीय टोलेबाजी बघायला मिळाली आहे.
हेही वाचा…मोठी बातमी…! “एकाची गाडी फोडली आता दुसऱ्याच्या घरावर दगडफेक,”जालन्यात मोठा राडा, दोन माजी मंत्री टार्गेटवर
निलंगा मतदारसंघातील एका कार्यक्रमात काॅंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर व भाजपचे नेते संभाजीराव पाटील निलंगेकर या दोघां काका पुतण्यामध्ये जोरदार टोलेबाजी बघायला मिळाली. एका कार्यक्रमात बोलतांना संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले की, निलंगा तालुका हा सुसंस्कृत तालुका असून या भागातील व्यापार वाढला पाहिजे. दळणवळणाची सुविधा निर्माण झाली पाहिजे. निलंगा मतदारसंघाच्या सुरक्षिततेसाठी मी स्वत: द्वारपाल म्हणून काम करेन. असं म्हटल्यानंतर त्यावर तुम्ही द्वारपाल असाल तर मी चौकीदार आहे. असं म्हणत अशोकराव पाटील निलंगकेर यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय. त्यावर सभागृहात एकच हश्शा पिकला.
हेही वाचा…राजेश टोपेंच्या गाडीवर दगडफेक, टोपेंनी ‘या’ माजी मंत्र्यांवर केलेत गंभीर आरोप
दरम्यान, आम्ही वेगवेगळ्या विचाराचे असल्याने अनेकांना प्रश्न पडला असेल की, एकाच व्यासपीठावर कसे, पंरतु तालुक्याच्या अथवा शहारांच्या चांगल्या कामासाठी निश्चितच एकत्र येणे गरजेचे आहे. आज काही राज्यांचे निकाल आले असली तरी त्यामध्ये हाताच्या मदतीशिवाय कमळ कसे फुलणार असाही टोला अशोकराव पाटील निलंगेकर यांनी लगावला.
READ ALSO :
हेही वाचा…शिंदेंचा मोठा मंत्री अडचणीत येणार ? व्हिडीओ व्हायरल करण्याचा जरांगे पाटलांनी दिला इशारा
हेही वाचा…निवडणुकांचा जल्लोष होत असतांना भाजपच्या दोन्ही गटात जोरदार राडा, 23 जणांवर गुन्हा दाखल
हेही वाचा…विद्यमान अन् भावी मुख्यमंत्र्यांला घाम फोडणारा भाजपचा बाहुबली कोण ? राजकारणात एकच चर्चा
हेही वाचा…राजस्थानमध्ये काॅंग्रेसला धोबीपछाड, कोण होणार मुख्यमंत्री ? भाजपच्या ‘या’ महिला नेत्या शर्यरीत
हेही वाचा…इंद्रायणी नदी संवर्धनासाठी ‘रेकॉर्ड ब्रेक’ सायकल रॅली! भाजपा आमदार महेश लांडगे यांची संकल्पना