जालना : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते आणि माजी मंत्री राजेश टोपे यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक करण्यात आली आहे. मात्र दगडफेक झाली, तेव्हा गाडीत राजेश टोपे नसल्याने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. या घटनेवरून राजेश टोपे यांनी माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर आता बबनराव लोणीकरांच्या घरावर अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा…ठरलं तर मग..! शरद पवार गट लोकसभेच्या बारामतीसह ‘या’ पंधरा ते सोळा जागा लढविणार
जालना जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या आवारात राजेश टोपे यांची गाडी उभी असता. त्यावर अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक करण्यात आली. या हल्लात गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. जालना मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुका सध्या सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर राजेश टोपे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत दाखल झाले होते. त्यावर राजेश टोपे यांच्या गाडीवर दगडफेक तसेच ऑईलही फेकण्यात आलं आहे. या घटनेचा आरोप राजेश टोपे यांनी माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्यावर केला आहे.
हेही वाचा…“ट्रिपल इंजिन, ट्रिपल वसुली”, मुंबईत तब्बल प्रतिदिन १.६३ कोटी रूपयाची वसुली, कोल्हेंनी सांगितला धक्कादायक अनुभव
दरम्यान, राजेश टोपे यांच्या आरोपानंतर आता बबनराव लोणीकरांच्या घरावर दगडफेक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. अचानक आलेल्या अज्ञाताच्या घोळक्याने बबनराव लोणीकर आणि त्यांचे बंधू यांच्या घरावर दगडफेक केलीय. त्यामुळे घटनास्थळी तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवरून हा राडा झाला असल्याचे बोलले जात आहे. तर राजेश टोपेंच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप लोणीकर यांच्याकडून करण्यात येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…राजेश टोपेंच्या गाडीवर दगडफेक, टोपेंनी ‘या’ माजी मंत्र्यांवर केलेत गंभीर आरोप
हेही वाचा…“बेरोजगाराच्या मुद्यांचा राजकीय खून झालाय का?”, जितेंद्र आव्हाडांचा संतप्त सरकारला सवाल
हेही वाचा…“इडीने मुंबई अन् दिल्लीतलं घर का ताब्यात घेतलं? त्याचाही पुस्तकात उल्लेख करावा,” शरद पवारांचा प्रफुल्ल पटेलांना टोला
हेही वाचा…मावळात श्रीरंग बारणेंच उमेदवार, उदय सामंताचं विधान, राष्ट्रवादी अन् भाजपमध्ये वाढली धाकधूक
हेही वाचा…“स्मशानातून आवाज येतात “माझ्या खुन्याला पकडा”, आव्हाडांच्या ‘या’ टिकेला अजित पवार गटाचं उत्तर