मुंबई : मुंबईतून बाहेर पडतांना एक धक्कादायक अनुभव खासदार अमोल कोल्हे यांना आला आहे. मुंबईच्या एका सिग्नलवर वाहतुक शाखेच्या एका महिला पोलिसांनी गाडी अडवून ड्रायव्हरला ऑनलाईन दंड भरण्यास सांगितले. त्यावर अमोल कोल्हे यांनी गाडीतून स्वत : उतरून पाहणी केली असता धक्कादायक माहिती समोर आल्याचा अनुभव अमोल कोल्हे यांनी सांगितला आहे.
हेही वाचा…“राजकारणात सगळे काही ‘असूर’ आणि ‘बेसूर’ नसतात, तर काही…”, गडकरी, फडणवीसांचा उल्लेख करत शिंदेंचं मोठं विधान
मुंबई असो किंवा इतर शहरातील वाहतुक शाखेच्या बांधवांबाबत मला आदर आहे. परंतु मुंबईतून बाहेर पडतांना एका सिग्रलवर वाहतुक शाखेच्या एका महिला पोलिसांनी गाडी अडवून ऑनलाईन दंड भरण्यास सांगितले. त्यावर त्या महिलेशी बोललो असतो. त्यावेळी त्या भगिनीने थेट मोबाईलवरील मेसेज दाखवला.
हेही वाचा…राहुल शेवाळेंना ठाकरे गट इंगा दाखवणार, लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरेंचा ‘हा’ शिल्लेदार सज्ज
त्या मोबाईलवरील मेसेज वर प्रत्येक चौकात २५०० रूपयांची वसुली व २० वाहनांवर कारवाई झाली पाहिजे, असं लिहिलं होतं. मुंबईत ६५२ ट्रॅफिक जंक्शन असून २५,००० गुणले केले असता त्याची १,६३,००० प्रति दिन म्हणजे फक्त एकट्या मुंबईत तब्बल १.६३ कोटी रूपयाची वसुली केली जात असल्याचं कोल्हेंनी सांगितलं.
हेही वाचा…“आरक्षणासाठी सरकारसोबत जनतेलाही वेठीस धरण्याचं काम”, भुजबळांची टिका
तसेच मुंबईत असं आहे तर इतर शहरांचं काय? असा सवाल करत संबंधित मंत्रीमहोदयांनी वा अधिकाऱ्यांनी खुलासा केल्यास वाहतुक शाखेचा उपयोग वाहतूक नियमापेक्षा वसुलीसाठी होताय का याची जनतेला माहिती मिळेल. ट्रिपल इंजिन, ट्रिपल वसुली असं म्हणत कोल्हेंनी सरकारवर टिका केली.
आजचा धक्कादायक अनुभव-
मुंबईत सिग्नल्स वाहतूक शाखेच्या महिला पोलिसांनी गाडी अडवून ड्रायव्हरला ऑनलाईन दंड भरण्यास सांगितले. मी स्वतः काय प्रकार आहे याची माहिती घेताना त्या भगिनीने थेट मोबाईलवरील मेसेज दाखवला- प्रत्येक चौकात २५००० रूपयांची वसुली व २० वाहनांवर कारवाई झाली पाहिजे!… pic.twitter.com/TJ3oq2oSsO
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) December 2, 2023
READ ALSO :
हेही वाचा…‘इंद्रायणी रिव्हर सायक्लॉथॉन’ टीमचा विश्वविक्रम; उद्या होणार रॅली! लाँगेस्ट लाईन ऑफ बायसिकल्स स्टॅटिक्स’च्या विक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
हेही वाचा…“मनसेच्या आमदाराचा श्रीकांत शिंदेंवर ‘पॉकेटमनी स्कॅम’ आरोप अन् राज ठाकरे पोहचले मुख्यमंत्र्यांच्या भेटीला”
हेही वाचा…दादा भुसे पुर्ण XXX झालाय, माफी मागावी, १७८ कोटींचा आरोप करत भुसेंवर संजय राऊतांचा हल्लाबोल
हेही वाचा…‘बारामतीचा गड’ उद्धवस्त करण्यासाठी मतांची बेरीज झाली, ‘सुनेत्रा पवार’ नव्हे तर ‘सुळें’च्या विरोधात ‘हा’ तगडा उमेदवार मैदानात ?
हेही वाचा…“साडेचार वर्षात काय लफडी केलीत, त्याचे व्हिडीओ शुटिंग, सगळं बाहेर काढणार”, सुजय विखे पाटलांचा रोख नेमका कुणाकडे ?