मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मुंबईत ठाकरे गटाने शिंदे गटाच्या विरोधात जोरदार फिल्डिंग लावली आहे. यातच महाविकास आघाडीत मुंबईतील लोकसभा मतदारसंघासाठी ठाकरे गट आग्रही असून याची जोरदार तयारी सुरू केली आहे. यातच शिंदे गटाचे लोकसभेतील गटनेते राहुल शेवाळे यांच्याविरोधात ठाकरे गटाचा उमेदवार ठरला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
हेही वाचा…“तर दोघांना खाली लोळवलं असतं”, जामीन मंजूर होताच दत्ता दळवींनी दिला इशारा
२०२४ ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून राहुल शेवाळे यांची उमेदवारी पक्की मानली जात आहे. यातच दोन आठवड्यापुर्वी मातोश्रीवर झालेल्या बैठकीत राहुल शेवाळे यांच्याविरोधात ठाकरे गटाने उमेदवार पक्का केला आहे. दक्षिण मध्ये मुंबई लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार अनिल देसाई यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.
हेही वाचा…“जयंत पाटलांनी घाण करायची अन् अजित पवारांनी साफ करायची”, त्यामुळेच राष्ट्रवादीचा ‘हा’आमदार भडकला
सुरूवातीला दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून राहुल शेवाळे यांच्याविरोधात विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्या नावाची चर्चा होती. मात्र पक्षांतर्गत कुरबुरीच्या अनेक तक्रारी समोर आल्याने सावंताना दक्षिण मुंबईतून उमेदवारी देण्याबाबत चर्चा सुरू आहे. तर उत्तर पश्चिम मतदारसंघातून शिंदे गटातील खासदार गजानन किर्तीकर यांच्याविरोधात त्यांचेच सुपूत्र अमोल किर्तीकर यांच्या नावावर विचारविनिमय सुरू आहे. तर ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार संजय दिना पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा आमचा प्रयत्न असेल असं खासदार विनायक राऊत यांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…“आरक्षणासाठी सरकारसोबत जनतेलाही वेठीस धरण्याचं काम”, भुजबळांची टिका
हेही वाचा…ठाकरे गटाची ‘ती’ मागणी नार्वेकरांनी फेटाळली, सत्तासंघर्षाची सुनावणी २२ तारखेपर्यंतच होणार
हेही वाचा…“..त्यामुळेच अनिल देशमुखांना मंत्रिपदाच्या यादीतून वगळलं,” अजित पवारांनी केला मोठा दावा
हेही वाचा…फडणवीसांनी लोकसभेच्या जागांचा अगोदरच जाहीर केलाय आकडा, अजित पवारांनी आज ४ जागा फिक्स केल्या, शिंदेंच्या वाट्याला किती?
हेही वाचा…अजितदादांचा गट बारामतीची जागा लढविणार, सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाल्या…