मुंबई : आगामी लोकसभा निवडणुका ह्या महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशा होणार आहे. परंतु त्याआधी जागावाटपावरून मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण लोकसभेच्या ४८ लोकसभा जागांपैकी ४ जागा अजित पवारांनी आज कर्जत येथील सभेतून जाहिर केल्या आहेत. यातच उद्धव ठाकरे यांच्या गटात असलेल्या जागा लढविण्याबाबात चर्चा करू असे संकेत अजित पवारांनी म्हटलंय. तर भाजप आणि शिंदेंच्या वाट्याला किती जागा येणार ? याची मोठी बातमी समोर आलीय.
हेही वाचा…रायगडचं पालकमंत्रीपद अदिती तटकरे यांना मिळणार ? अजित पवारांनी दिले संकेत
राज्यात लोकसभेच्या ४८ जागापैकी ४५ जागा जिंकण्याचा संकल्प महायुतीने ठेवला आहे. यातच भाजप राज्यातल्या २६ जागा लढणार असून अजित पवार आणि शिंदे गटाला प्रत्येकी ११ जागा मिळणार अशी चर्चा आहे. परंतु केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करून शिंदे गटाला १३ जागा मिळणार असल्याचा दावा शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी केला आहे. यातच एका दैनिकाला मुलाखत देतांना भाजप २६ जागा तर शिंदे आणि अजित पवार गट २२ जागा लढवणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं होतं.
हेही वाचा…सुळे आणि कोल्हेंच्या विरोधात अजित पवार गट निवडणुक लढवणार ? अजित पवारांनी स्पष्ट केलं, उमेदवार कोण ?
दरम्यान, मागच्या निवडणुकीच्या वेळी भाजप शिवसेना युतीत भाजपने २५ तर शिवसेनेने २३ जागा लढविल्या होत्या. मात्र यावेळी पक्ष फुट झाल्यानंतर यात मोठा बदल होऊ शकतो. यातच फडणवीसांनी भाजप २६ जागा लढविणार असल्याचं स्पष्ट केलं आहे म्हणजे शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाला २२ जागा शिल्लक राहतात. यातच जिंकलेल्या जागांवरून जागावाटप ठरलं तर अजित पवार गटाला फक्त चार जागा मिळतात. तर शिंदेंच्या वाट्याला १८ जागा येतात. यातच नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी बनवायचं असेल तर भाजप जिंकेलेल्या जागांवरून जागा वाटप ठरवण्याची दाट शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा…अजितदादांचा गट बारामतीची जागा लढविणार, सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाल्या…
हेही वाचा…“तर दोघांना खाली लोळवलं असतं”, जामीन मंजूर होताच दत्ता दळवींनी दिला इशारा
हेही वाचा…“जयंत पाटलांनी घाण करायची अन् अजित पवारांनी साफ करायची”, त्यामुळेच राष्ट्रवादीचा ‘हा’आमदार भडकला
हेही वाचा…आढळराव पाटील अजित गटात प्रवेश करणार अन् कोल्हेंच्या विरोधात निवडणुक लढणार ? लोकसभेच्या निवडणुकीसाठी रणनिती ठरली
हेही वाचा…”नालायक” नाही तर मग काय सांगू ? उद्धव ठाकरेंकडून शिंदेंचा पुन्हा ”नालायक” उल्लेख