पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुती तसेच महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. यातच राज्यात ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचा संकल्प महायुतीने ठेवला आहे. यातच आता देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर लोकसभा मतदारसंघाचा वाटप करण्यात येणार आहे. यातच आज कर्जत येथील सभेत अजित पवारांनी कोणत्या लोकसभा लढविणार यावर भाष्य केलं आहे.
हेही वाचा…जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी १३० जेसीबी तयार, १४० एकरवर सभा, पोलिस तैनात, जालन्यातील सभा वादळी ठरणार का ?
बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड लोकसभा निवडणुक लढविणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे. यातच आता शिरूर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे यांच्या विरोधात उमेदवार देणार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत. मागच्या निवडणुकीत शिवसेनेचे तगडे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा अमोल कोल्हे यांनी पराभव केला. यातच आता पुन्हा २०२४ ची लोकसभा निवडणुक लढण्याची इच्छा शिवाजीराव आढळराव पाटलांनी व्यक्त केलीय.
हेही वाचा…शनिशिंगणापुर देवस्थानमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार, बावनकुळे, कराडांची उपोषणस्थळी भेट, म्हणाले…
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत शिरूर लोकसभेची जागा अजित पवार गटाच्या वाट्याला जाऊ शकते. त्यामुळे याठिकाणी अमोल कोल्हेंच्या विरोधात अजित पवार गटाला तगडा उमेदवार उभं करावं लागणार आहे. त्यामुळेच याठिकाणी आता शिवाजीराव आढळराव पाटील हे अजित पवार गटात प्रवेश करणार असून ते अमोल कोल्हेंच्या विरोधात उभं राहणार असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात केली जात आहे. त्यामुळे शिरूरमध्ये राष्ट्रवादी विरूद्ध राष्ट्रवादी असा सामना बघायला मिळण्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा…”नालायक” नाही तर मग काय सांगू ? उद्धव ठाकरेंकडून शिंदेंचा पुन्हा ”नालायक” उल्लेख
हेही वाचा…रायगडचं पालकमंत्रीपद अदिती तटकरे यांना मिळणार ? अजित पवारांनी दिले संकेत
हेही वाचा…सुळे आणि कोल्हेंच्या विरोधात अजित पवार गट निवडणुक लढवणार ? अजित पवारांनी स्पष्ट केलं, उमेदवार कोण ?
हेही वाचा…“त्याचे काय डोळे गेले आहेत का ?” एकेरी उल्लख करत जरांगे पाटलांचा भुजबळांवर हल्लाबोल
हेही वाचा…लोकसभेच्या कोणत्या जागा लढविणार ? अजित पवारांनी सगळंच सांगितलं, म्हणाले…